धाराशिव – समय सारथी
चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीच्या नाकाचा शेंडा कापून गंभीर जखमी केल्याची घटना धाराशिव येथे घडली असुन याप्रकरणी पतीवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बरमगाव येथील ही घटना असुन रागाच्या व संशयाच्या भरात हा प्रकार पतीने केला. वामन मारुती सगट (रा. लोणी काळभोर, संभाजीनगर, पुणे, ह.मु. बरमगाव बु.) या व्यक्तीने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यावर प्राणघातक हल्ला केला.
16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारास 5 वाजता घरगुती कारणावरून वाद झाल्यानंतर आरोपी वामन सगट यांनी घरातील कांदा कापण्याच्या बतईने (सुरीने) पत्नी चंद्रकला वामन सगट (वय 35) हिचा नाकाचा शेंडा कापून तिला गंभीर जखमी केले. या घटनेची फिर्याद पीडितेचा भाऊ वैजिनाथ तानाजी कांबळे (वय 40, रा. बरमगाव बु.) यांनी बेंबळी पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 118(2) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास बेंबळी पोलीस करत आहेत.












