Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

मृत्युदंड द्या – शांत डोक्याने नियोजनबद्ध कट, आनंदीदेवी राजेनिंबाळकरांची कोर्टाला विनंती 

समय सारथी by समय सारथी
June 15, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

हेतु, शत्रुत्वसह हत्याकांड पुर्वी व नंतरचा घटनाक्रम – तेरणा ट्रस्ट, कारखाना, निवडणुक वाद, भागीदारी

धाराशिव – समय सारथी

कै पवनराजे निंबाळकर व त्यांचा ड्राइवर समद काझी या दुहेरी हत्याकांडात पवनराजे यांच्या पत्नी आनंदीदेवी राजेनिंबाळकर यांच्या वतीने कोर्टात लेखी युक्तीवाद सादर केला आहे. डॉ पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 आरोपीनी शांत डोक्याने नियोजनबद्ध कट रचून हे दुहेरी हत्याकांड केले, संशयाच्या पलीकडे जाऊन सर्व पुरावे असल्याने व आरोप सिद्ध होत असल्याने आरोपीना मृत्यु दंडाची शिक्षा करावी अशी विनंती आनंदीदेवी राजेनिंबाळकर यांनी कोर्टास केली आहे. 

ऍड पी एम गवाड यांनी युक्तिवाद सादर केला आहे, या खटल्यासाठी कोर्टाने 16 जुन निकालाची तारीख ठेवली असुन सर्व आरोपीना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईतील अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश एस आर नावंदर यांच्या कोर्टात सुनावणी सुरु आहे.

पवनराजे हत्येपुर्वी व हत्याकांडानंतर घडलेल्या घटनाचा क्रम प्राधान्याने पुरावे व दाखल्यांसह मांडला आहे. हत्येचा हेतु (Motive) कारणे, शत्रूत्व ( Enimity) हे सिद्ध करण्यासाठी विधानसभा निवडणुक, राजकीय वाद, तेरणा ट्रस्ट, जिल्हा बँक, साखर घोटाळा, डॉ पद्मसिंह पाटील, आरोपी सतीश मंदाडे, मोहन शुक्ला, शशिकांत कुलकर्णी यांच्यातील आर्थिक हीत संबंध, भागीदारी, पवनराजे यांना आलेल्या धमक्या यावर लेखी युक्तीवादात भर दिला आहे. हत्याकांडपुर्वी पवनराजे यांच्या 30 जुन 2003 ला ढोकी येथील सभेसह अन्य ठिकाणी झालेले हल्ले, धमकी असलेबाबतचे पत्र, हत्याकांडनंतर तपास सीबीआयकडे द्यावा या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चावर डॉ पाटील यांचे भाचे अमोल पाटोदेकर व समर्थकांनी केलेली दगडफेक यांचा उल्लेख केला आहे. 

नात्याने चुलत भाऊ असलेल्या डॉ पद्मसिंह पाटील व पवनराजे यांच्यात सुरुवातीपासून राजकीय सुप्त संघर्ष होता. 1991 साली पवनराजे हे जागजी येथून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले त्यावेळी त्यांना अध्यक्ष व्हायचे होते मात्र डॉ पाटील यांनी विरोध केल्याने त्यांनी राजीनामा दिला. महावितरण सदस्यपदी पवनराजे यांची नेमणूक करून या वादाचा समझोता करण्यात आला. 1995 तेरणा कारखाना संचालक झाले, 1994 जिल्हा बँक संचालक, 1996 ते 2002 जिल्हा बँक चेअरमन असा कारभार पवनराजे यांनी पाहिला मात्र 2002 नंतर होम ट्रेड व साखर घोटाळा याचे खापर पवनराजे यांच्यावर फोडण्यात आले, त्यातून पवनराजे यांना अटक व जेलमध्ये टाकले. पवनराजे यांना लोकांचा वाढता पाठिंबा पाहुन राजकीय अस्तित्व धोक्यात आल्याने खुन करून ‘काटा’ काढण्यात आल्याचे युक्तिवादात म्हण्टले आहे. 

पवनराजे यांनी त्यांच्या जीवाला धोका असल्याचे लेखी पत्र त्यांनी 9 जुन 2003 रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी यांना दिले होते त्यात त्यांनी डॉ पद्मसिंह पाटील यांच्या पासून जीवाला धोका असल्याचे म्हणटले होते. मी मंत्री असल्याने मी तुला कोठेही कसा ही, कोणत्याही क्षणी मारून टाकीन, कोणालाही काहीही माहिती होऊ देणार नाही, कोणाला थांगपत्ता लागणार नाही, अशी धमकी डॉ पाटील यांनी दिल्याचा आरोप त्यात पत्रात होता मात्र कारवाई झाली नाही. ते पत्र पुरावा म्हणून सोबत जोडले आहे.

डॉ पाटील यांनी तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा निधी वापरून तेरणा ट्रस्ट स्थापन केली त्यात त्यांनी मेडिकल कॉलेज व इतर शैक्षणिक संस्था सुरु करून डोनेशनच्या नावाखाली पैसे कमावले, तेरणा ट्रस्टच्या गाड्या ते वापरत, शेतकऱ्यांना या ट्रस्टचा फायदा होत नव्हता त्यामुळे पवनराजे यांनी विरोध करीत याबाबतची तक्रार पवनराजे, शुरसेन राजेनिंबाळकर व संदीपान शितोळे यांनी पोलिस व लातूर येथील धर्मादाय आयुक्त यांच्याकडे केली होती. 

पवनराजे निंबाळकर यांनी 2004 मध्ये अपक्ष म्हणून उस्मानाबाद विधानसभा निवडणूक डॉ पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात लढवली त्यावेळी त्यांनी दैनिक जागृत जनप्रवास या वृत्तपत्रात पवनराजे निंबाळकर यांचा डॉ पद्मसिंह पाटील यांना पाठिंबा ? आणि पवनराजे विधानसभेवर अशी बातमी छापून आणली व ते पेपर जीवनराव गोरे व इतर कार्यकर्ते यांनी वाटले, त्याची तक्रार बेंबळी पोलिसात गाडी नंबर व नावासह दिली होती मात्र कारवाई झाली नाही त्यानंतर 484 मतांनी पवनराजे यांचा पराभव झाला. त्यामुळे पवनराजे यांनी उच्च न्यायालयात डॉ पाटील विरोधात याचिका दाखल केली. ही याचिका मागे घेण्यासाठी अजित बाबा पाटील यांनी अनेकवेळा दबाव आणला मात्र ती पवनराजे यांनी मागे घेतली नाही त्यासाठी दबाव होता असे म्हण्टले आहे. 

आरोपी सतीश मंदाडे व डॉ पद्मसिंह पाटील आणि अजित पाटील हे व्यावसायिक भागीदार होते. पंचम ऍकवा ठाणे येथे मोहन शुक्ला व इतर पार्टनर होते. या सगळ्यांची पुर्वीपासून ओळख व कौटुंबिक संबंध होते, हत्यापुर्वी मंदाडे यांनी पवनराजे यांना अनेक वेळा डॉ पाटील यांच्याशी जुळवून घ्या असे सांगत धमक्या दिल्या. जे काही झाले ते मिटवून घ्या त्याचे परिणाम नाहीतर खूप वाईट होतील. तो खूप मोठा माणूस आहे, जर तुझे काही बरे वाईट झाले तुझ्या कुटुंबाचे कोण बघणार. असे धमाकावले त्यानंतर 10-12 दिवसात पवनराजे यांची हत्या झाली. डॉ पाटील यांनी हत्येची सुपारी दिल्याचे पवनराजे अनेक वेळा सांगत होते असे युक्तीवादात नमूद केले आहे. 

दुहेरी हत्याकांडातील माफीचा साक्षीदार पारसमल जैनला 14 वर्षांनी व शुटर दिनेश तिवारी आणि पिंटू सिंग या 2 आरोपींना तब्बल 16 वर्षानंतर तर डॉ पाटील यांना साडे 3 महिन्यात जामीन मिळाला असुन सर्व आरोपी जामिनावर आहेत, त्यांना 16 जुनला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

Previous Post

आमदार प्रा तानाजीराव सावंतांची बसवराज पाटीलांनी घेतली भेट – सामाजिक व राजकीय चर्चा

Next Post

डॉ पाटील निर्दोष – 1 हजार 250 पानांचा लेखी युक्तिवाद – कै पवनराजे दुहेरी हत्याकांडात गुंतवले

Related Posts

महाराष्ट्र

डॉ पाटील निर्दोष – 1 हजार 250 पानांचा लेखी युक्तिवाद – कै पवनराजे दुहेरी हत्याकांडात गुंतवले

June 15, 2026
महाराष्ट्र

आमदार प्रा तानाजीराव सावंतांची बसवराज पाटीलांनी घेतली भेट – सामाजिक व राजकीय चर्चा

June 14, 2026
महाराष्ट्र

रणनिती व विकास काम – प्रा आ तानाजीराव सावंत यांनी घेतली आढावा बैठक 

June 14, 2026
महाराष्ट्र

‘हरित धाराशिव’ची जय्यत तयारी – सामाजिक वनीकरण विभागाकडून 35 लाखांहून अधिक रोपांची निर्मिती

June 14, 2026
महाराष्ट्र

न्याय व्यवस्थेवर विश्वास – कोर्ट योग्य शिक्षा देईल,पवनराजे हत्येचा 16 जुनला निकाल, हजर राहणार – खासदार ओमराजेंची प्रतिक्रिया

June 14, 2026
महाराष्ट्र

मुंडेची बदली केली तर मी सरकारच्या मागे लागेल – मनोज जरांगेंचा इशारा, त्यांना काम करू द्या

June 14, 2026
Next Post

डॉ पाटील निर्दोष - 1 हजार 250 पानांचा लेखी युक्तिवाद - कै पवनराजे दुहेरी हत्याकांडात गुंतवले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

डॉ पाटील निर्दोष – 1 हजार 250 पानांचा लेखी युक्तिवाद – कै पवनराजे दुहेरी हत्याकांडात गुंतवले

June 15, 2026

मृत्युदंड द्या – शांत डोक्याने नियोजनबद्ध कट, आनंदीदेवी राजेनिंबाळकरांची कोर्टाला विनंती 

June 15, 2026

आमदार प्रा तानाजीराव सावंतांची बसवराज पाटीलांनी घेतली भेट – सामाजिक व राजकीय चर्चा

June 14, 2026
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp