6 खासदार शिवसेनेत सहभागी, धनुष्यबाणावर उभे राहून निवडून येतील
धाराशिव – समय सारथी
खासदार ओमराजे निंबाळकर हे नावाप्रमाणे जनतेच्या मनाचे राजे असुन ते रील नव्हे तर रिअल स्टार आहेत. कै पवनराजे निंबाळकर हत्याकांडचा निकाल दुर्दैवी व अनपेक्षित असुन शिवसेना त्यांच्या पाठीशी आहे असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आम्ही कायदा व संविधानाच्या चौकटीत राहून सर्व प्रक्रिया पुर्ण केली आहे, ओमराजेसह 6 खासदार शिवसेनेत सहभागी झाले असुन ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याची घोषणा करीत सर्व खासदार यांचे शिवसेनेत स्वागत करून शुभेच्छा दिल्या.
2029 मध्ये हे 6 खासदार शिवसेना तिकिटावर धनुष्यबाणावर उभे राहून निवडून येतील असे शिंदे म्हणाले. यावेळी पालकमंत्री प्रतापराव सरनाईक, आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत उपस्थितीत होते. ओमराजे यांचे बंधू डॉ जयप्रकाश राजेनिंबाळकर, मामा बालाजी पाटील यांनी सुद्धा शिवसेना पक्षात प्रवेश केला.

ओमराजे हे मनाचे राजे आहेत, ते सुद्धा एकत्र आले. त्यांनी कार्यकर्ते यांच्याशी चर्चा, बोलण केली, मतदारसंघात कामे विकास झाला पाहिजे. काही लोकांनी त्याना हीनवले पण ओमराजे यांनी दुर्लक्ष केले. त्यांना रीलस्टार म्हणाले त्यांच्याकडे होते तेव्हा रिअल स्टार होते. जमिनीवरचा नेता कसा असतो हे ओमराजे यांच्याकडुन शिकावे असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. त्यांच्या वडिलांच्या हत्येच्या प्रकरणात दुर्दैवाने अनपेक्षित निकाल लागला, शिवसेना त्यांच्या पाठीशी उभी आहे असे आश्वस्त केले.

आम्ही अडवायला तुडवायला नाही तर वाढवायला आलो आहोत आमच्या आडवे आले तर बाळासाहेब यांनी सांगितले आहे त्याप्रमाणे करू. आमची निती, नियत स्वच्छ असुन हिंदुत्व विचार धारा घेऊन पुढे गेलो, ज्यांनी विचारधारा सोडली त्यांना लोकांनी नाकारले. अनेक जण विचार धारेशी जुडत आहे, विकासाचा अजेंडा असुन दिलेला शब्द पाळणारी अशी विश्वासहर्ता आहे म्हणुन येणाऱ्यांचा मोठा ओढा आहे.
6 खासदार यांच्या मतदार संघातील विकास कामे मार्गी लावू असे आश्वासन दिले, हा कार्यकर्ते यांचा पक्ष आहे. कोणी मालक नाही, सहकारी आहोत, कोणी नेता नाही, मी कार्यकर्तेसारखा वागेल, मानसन्मान ठेवेल, विश्वासाला तडा जाणार नाही, मी दिलेला शब्द पाळतो. केंद्रातील प्रश्न सुद्धा सोडवू. शिवसेना अधिक मजबूत करायची, वाढवायची असुन गावागावात, घराघरात, तळागाळात पोहचवायची आहे.
चार वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही उठाव केला, तेव्हा 40 आमदार सोबत होते. आज आम्ही चौकार नाही, तर थेट षटकार मारला आहे. हे एक नाही, तर आमचे 6 ‘टायगर’ आहेत,” आमच्याकडे आता 3 सांजय आहेत अशा शब्दांत शिंदेंनी ठाकरे गटावर जोरदार प्रहार केला. मुंबईत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. यात संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील या खासदारांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे.











