धाराशिव – समय सारथी
ओमराजेनी स्वतःचा भाव वाढवून घेत 100 कोटी घेतले आहेत. स्वतःला बाजारात विकले असून निधी नाही म्हणून बोंबलत आहेत. सत्तेतील खासदारालाच निधी नाही तर यांना कुठून मिळणार ? असे सांगत स्वतःच्या फायद्यासाठी ओमराजे कुठले असल्याचा आरोप आमदार अंबादास दानवे यांनी केला.
त्यांनी वडिलांचा खून झाल्याचे दुःख असल्याचे सांगितले मात्र तुम्हाला निवडून आणणाऱ्या शिवसैनिक समाधान पाटील याला मतदाना दिवशी मारण्यात आले. त्याला देखील दोन मुले आहेत त्यांच्या मुलांना तुम्ही आजपर्यंत साधी भेट दिली नाही. त्यांना तुम्ही वाऱ्यावर सोडले आहे तुमचे दुःख तुम्हाला कळते मात्र त्यांचे दुःख नाही का ? असा प्रश्नही त्यांनी विचारला.
टायगर ऑपरेशन नव्हे म्हणतात आणि वाय प्लस सुरक्षा देता. तुम्ही जिल्ह्यात फिरा तुम्हाला झेड प्लस सुरक्षा असू द्या तुम्हाला तुडविल्याशिवाय शिवसैनिक गप्प बसणार नसल्याचा इशारा दिला. तसेच तुम्ही मतदारांचा, जनभावणेचा अवमान केला असल्याचा आरोप त्यांनी केला.











