तुळजापूर – समय सारथी
भाविकांची वाढती गर्दी पाहता तुळजाभवानी मंदीर संस्थानचा मोठा निर्णय घेतला आहे.महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे मंदीर वर्षभरातील प्रत्येक मंगळवार, शुक्रवार, रविवार व पौर्णिमा दिवशी पहाटे 1 वाजता उघडले जाणार आहे. 31 डिसेंबर 2024 पर्यंत मंदीर संस्थांनाच्या या निर्णयाची अंमलबजावणी होणार असुन तहसीलदार तथा व्यवस्थापक सोमनाथ वाडकर यांनी याबाबत जाहीर प्रकटन काढले आहे.
तुळजाभवानी देवीचे मंदीर पहाटे 1 वाजता चरणतीर्थ पुजा होऊन सकाळी 6 वाजता घाट देऊन अभिषेक पुजा सुरु होणार आहेत.