धाराशिव – समय सारथी
मराठा आरक्षणसाठी धाराशिव जिल्ह्यात आणखी एका मराठ्यांने बलीदान दिले असुन पाटोदा गावातील शिवाजी उर्फ अमोल विठ्ठल निलंगे यांनी गळफास घेत आत्महत्या करीत जीवन संपविले. आत्महत्या करण्यापुर्वी निलंगे यांनी एक चिठ्ठी लिहली असुन त्यात व्यथा मांडली आहे.
शिवाजी यांनी आत्महत्या करण्यापुर्वी एक चिठ्ठी लिहली आहे, त्यात माझ्यावर ट्रकटर व शेतीचे कर्ज जास्त झाले आहे. यावर्षी नापिकी आहे. माझ्या मुलाचा नंबर सैनिक स्कुल यादीत सर्वात लास्टला लागला कारण पहिल्या यादीत इतर मागासवर्गीय यांचा नंबर लागला कारण आमच्या समाजाला मराठा आरक्षण पासुन वंचित ठेवले आहे. या सर्व गोष्टीचा विचार करुन आत्महत्या करीत आहे.
आत्महत्याची घटना झाल्यानंतर गावकऱ्यांनी बेंबळी पोलिस ठाण्यात जात माहिती दिलीन, त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मदत द्यावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.