धाराशिव – समय सारथी
डॉ तानाजीराव सावंत यांना तुम्ही आमदार करा, मी त्यांना मंत्री करतो असे वचन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परंडा येथील प्रचार सभेत मतदारांना दिले होते. एकनाथ शिंदे यांचा हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होतो आहे. शब्द पाळणारा मुख्यमंत्री अशी एकनाथ शिंदे यांची देशभर ओळख आहे त्यामुळे सावंत हे निश्चित मंत्री होतील व मुख्यमंत्री वचनपुर्ती करतील असा विश्वास कार्यकर्ते समाजमाध्यमातून व्यक्त करत आहेत. धाराशिवला लागून असणाऱ्या लातूर बीड सोलापूर या 4 जिल्ह्यात डॉ तानाजीराव सावंत यांच्या रूपाने एकमेव आमदार निवडून आला असल्याने मंत्री पद मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. दरम्यान डॉ तानाजीराव सावंत यांनी मंत्री पदासाठी तगडी फील्डिंग लावायला सुरुवात केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.
7 टीएमसी पाणी उजनीतुन गुढीपाडव्यापर्यंत येणार आहे. भुम परंडा वाशी या तिन्ही तालुक्यात शिवाजी महाराज पुतळा बसवणार, वीज वितरण व्यवस्था सुधरवायची आहे. तानाजीराव तुमचं काम बोलतंय, गेल्या 35 वर्षाचा या मतदार संघाचा बॅकलॉग भरून काढायचा आहे त्यासाठी मी तुमच्या पाठीशी उभा आहे. सावंत यांना आमदार म्हणुन निवडुन द्या, मी पुन्हा एकदा त्यांना नामदार मंत्री करायची जबाबदारी माझ्यावर असल्याचे वचन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते, तो व्हिडिओ व्हायरल होत आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परंडा येथील कोटला मैदानात महाविजय संकल्प सभा घेतली होती व विकासासाठी महायुतीचे उमेदवार सावंत यांना निवडुन द्यावे असे आवाहन मतदार यांना केले होते त्याप्रमाणे सावंत यांना लोकांनी आमदार केले आहे. आता ते नामदार होण्याची वाट धाराशिव जिल्ह्यातील मतदार, नागरिक पाहत आहे.
मंत्री सावंत यांनी आरोग्य विभागात अनेक योजना आणल्या जागरूक पालक सुदृढ बालक, आरोग्य तरुणाईचे वैभव महाराष्ट्रचे, आरोग्याची वारी पंढरीच्या दारीचे जागतिक रेकॉर्ड झाले. शिवजल क्रांती ते उद्योग, आरोग्य, हरीत क्रांती केली. त्यांच्या काळात हजारो कोटी रुपयांचा निधी मिळाला असुन त्यातून अनेक विकासकामे झाली आहेत त्यामुळे त्यांना मंत्री करावे अशी मागणी होत आहे.