परंडा – समय सारथी
शिवसेना पक्षाचे नेते तथा माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे दुःखद निधन झाले असल्याचे वृत्त काही सोशल मीडिया ग्रुपवर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. या निधन वृत्तानंतर माजी आमदार सुजितसिंह ठाकुर यांनी एक पोस्ट करुन त्यांची तब्येत चांगली असल्याचे सांगत त्यांच्यासाठी प्रार्थना केली आहे. पाटील हे आजारी असुन त्यांच्यावर पुणे येथील रुबी रुग्णालयात उपचार सुरु आहेत त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. ते सध्या व्हेंटिलेटर सपोर्टवर असुन फुफुसाला इन्फेक्शन झाले असुन किडनी निकामी झाली आहे.
गेल्या काही वर्षापुर्वी त्यांचे किडनीचे ऑपरेशन झाले होते. बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक अशी ज्ञानेश्वर तात्या पाटील यांची ओळख असुन ते तात्या नावाने सर्वांना परिचित आहेत.