Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

गुन्हा नोंद करा – तुळजाभवानी मंदिरातील सोने चांदी अपहार प्रकरणी उच्च न्यायालयाचे आदेश, हे अधिकारी येणार अडचणीत

समय सारथी by समय सारथी
May 9, 2024
in महाराष्ट्र
0
0
SHARES
107
VIEWS

धाराशिव – समय सारथी 

तुळजाभवानी देवीचा मंदिरातील 1991 ते 2009 या काळातील सोने चांदी अपहार प्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा नोंद करण्याचे आदेश छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने दिले आहेत. कलम 420, 467,468,471,406, 409 अंतर्गत गुन्हा नोंद करुन त्याचा तपास सीआयडीच्या पोलिस अधीक्षक दर्जाच्या अधिकारी यांच्याकडे देण्याचे आदेशात नमूद केले आहे. न्यायमूर्ती शैलेश भ्रहमे व मंगेश पाटील यांच्या खंडपीठाने सरकारला आदेश दिले असुन तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ प्रवीण गेडाम यांच्या तपासणीत हा घोटाळा उघड झाला होता. 

39 किलो सोने आणि 608 किलो चांदी अपहार प्रकरणी सीआयडी, पुणे व लातूर धर्मादाय आयुक्त यांच्या चौकशी अहवालानंतर उच्च न्यायालयाने गुन्हे नोंद करण्याचे आदेश दिले आहेत. तात्कालीन जिल्हाधिकारी, नगराध्यक्ष, आमदार, विश्वस्त असलेले अधिकारी व सिंहासनपेटी ठेकेदार कायद्याच्या अडचणीत येणार आहेत. सन 1991 ते 2010 या 20 वर्षाच्या काळातील हा अपहार झाला असल्याचे अनेक चौकशीत उघड मात्र गुन्हा नोंद होत नसल्याने हिंदू जनजागरण समितीने कोर्टात जनहित याचिका दाखल केली होती शिवाय पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी सुद्धा याची तक्रार केली होती. 

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या तिजोरीतील सोने चांदीवर डल्ला मारल्याप्रकरणी 42 अधिकारी यांना पुणे येथील सीआयडीने तपासात दोषी ठरवत फौजदारी कारवाईची शिफारस राज्य सरकारकडे 2015 साली केली होती तेव्हापासुन कारवाई झाली नव्हती. 7 कोटी 19 लाख रुपयांचा हा अपहार असून यामध्ये तत्कालीन आमदार , 8 नगराध्यक्ष 42 अधिकाऱ्यासह 62 जण सहभागी आहेत.

धाराशिवचे तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल पवारांनी 1991 साली दानपेट्यांचा लिलाव प्रथम सुरु केला तेव्हापासुन या घोटाळ्यास सुरुवात झाली त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ प्रवीण गेडाम यांनी तुळजाभवानी मातेच्या दानपेटीतील उत्पन्न तपासून हा महाघोटाळा उघड केला. देवीच्या सिंहासन पेटीतील गैरव्यवहार प्रकरणी 2012 पासुन सीआयडी चौकशी सुरु होती यात अनेक वरिष्ठ आयएएस अधिकारी, तात्कालीन आमदार यांची चौकशी करण्यात आली.

पुणे सीआयडीने या सोने चांदी घोटाळा प्रकरणी तत्कालीन 42 अधिकारी कर्मचाऱ्यांवर घोटाळ्याचा आरोप ठेवला आहे यामध्ये 9 उपविभागीय अधिकारी , 9 तहसीलदार , 10 ठेकेदार , 14 मंदिर कर्मचारी यांचा समावेश आहे तर 11 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या खातेअंतर्गत कारवाईची शिफारस करण्यात आली होती. मंदिराचे विश्वस्त असलेले 8 माजी नगराध्यक्ष व तत्कालीन आमदार याच्यावर निष्काळजीपणाचा आरोप सीआयडीने ठेवला होता.

सन १९९९ ते २००९ या काळातील नोंदीनुसार मंदिर देवस्थानकडे केवळ ५ तोळे सोने व अर्धा किलो ग्रॅम चांदी जमा झाली हे खरच पटत नसल्याने या घटनेनंतर तत्कालीन जिल्हा अधिकारी तथा मंदीर संस्थानचे अध्यक्ष डॉ प्रवीण गेडाम यांनी तुळजाभवानी मातेचे उत्पन्नाचा आकडा तपासण्यासाठी १९ मार्च २०१० मध्ये १ महिन्यासाठी सील केल्या. या एक महिन्यात तुळजाभवानीच्या दानपेटीत २३ लाख रोख व ४० तोळे सोने व ६ किलो चांदी सापडली होती. लातूर धर्मादाय आयुक्ताकडे तक्रार अर्ज करून या प्रकरणाची चौकशी सीआयडी मार्फत करण्याची विनंती केली, या तक्रारीनंतर एकामागून एक खुलासे होत गेले.

सन १९८४ ते १९९१ या काळात दानपेट्या मंदिर संस्थांकडे होत्या तर १९९१ ते २०१० दरम्यान लिलाव पद्धतीने त्या ठेकेदाराकडे होत्या . ठेकेदाराला देण्यात आलेले ठेके नाममात्र दराचे होते . ठेकेदार व व मंदिर संस्थांनचे अधिकारी यांनी संगनमत करून तुळजाभवानी मातेच्या चरणी अर्पण केले सोने मातेच्या तिजोरीत जमा केलेच नाही .

लातूरच्या विशेष लेखा परिक्षण पथकाने 1989 ते 2009 असा 20 वर्षांचा तुळजाभवानी मंदिराचा ताळेबंद तयार केला. 348 पानांचा हा अहवाल औरंगाबाद विभागीय आयुक्तांनी सीआयडीला सादर केला आहे . 20 वर्षात मंदिराच्या दान पेटीत आलेले हिरे, मोती, पाचू आदि मौल्यवान वस्तू गायब झाले आहेत. वर्षाला सोनं, चांदी आणि कोटी रुपये रोकड जमा होते मात्र 20 वर्षात यातील बरच सोन चांदी मंदिर संस्थांच्या दप्तरी जमा झाले नाही.

अधिकारी कोण –

तत्कालीन जिल्हाधिकारी व मंदीर संस्थानचे अध्यक्ष असलेले आयएएस अधिकारी अनिल पवार , संजय कुमार , राजेश कुमार , मधुकर कोकाटे , सुरेंद्र कुमार बागडे , शिरीष कारळे, संजय अग्रवाल , एस चोकलिंगम , आशीष शर्मा , एम पी देवणीकर हे 11 अधिकारी आहेत.

10 ठेकेदार –

चंदर सोंजी , बाळकृष्ण कदम, धन्यकुमार क्षिरसागर , संभाजी कदम , अरुण सोंजी , संजय कदम , दगडोबा शिंदे , अजित कदम , आनंद क्षिरसागर व बापू सोंजी हे या काळात ठेकेदार आहेत.

Previous Post

धाराशिवचं – नामांतरण विरोधी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली – धाराशिव नावावर शिक्कामोर्तब 

Next Post

छत्रपती शंभुराजे जन्मोत्सव – आमदार सुरेश धस यांच्या हस्ते राजमुद्रा प्रतिष्ठानच्या मिरवणुकीचा शुभारंभ

Related Posts

महाराष्ट्र

ड्रग्ज गुन्हा – तस्कर गटातील एका फरार आरोपीला अटकपुर्व जामीन मंजुर – धाराशिव कोर्टाचा निकाल, पहिला जामीन

July 3, 2025
महाराष्ट्र

‘तो’ साहेब कोण ? कोडं – 4 लाखांचे लाच प्रकरण – आरोपी शेखला आज कोर्टात हजर करणार, दबाव ? ठाण्यातील सीसीटीव्ही तपासण्याची गरज 

July 3, 2025
महाराष्ट्र

ड्रग्ज तस्करी गुन्हा – 3 जुलैला सुनावणी, 15 आरोपी फरार, पुरवणी दोषारोपपत्र, कडक कारवाई – पोलिस अधीक्षक खोखर

July 2, 2025
महाराष्ट्र

खाते अंतर्गत चौकशी, अनेक तक्रारी – लाच प्रकरणात पोलिस निरीक्षक शेळके अडचणीत, पोलीस अधीक्षक रितु खोखर यांची माहिती

July 2, 2025
महाराष्ट्र

धाराशिव नगर परिषद घोटाळा – अपर जिल्हा पोलिस अधीक्षक नोडल अधिकारी, एसआयटी चौकशी

July 2, 2025
महाराष्ट्र

तो साहेब कोण ? निष्पन्न – लाचलुचपत विभागाला आव्हान, 3 लाख दिल्याचा दावा – 4 लाखांची लाच प्रकरण, पोलीस कोठडी, निलंबन

July 2, 2025
Next Post

छत्रपती शंभुराजे जन्मोत्सव - आमदार सुरेश धस यांच्या हस्ते राजमुद्रा प्रतिष्ठानच्या मिरवणुकीचा शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

ड्रग्ज गुन्हा – तस्कर गटातील एका फरार आरोपीला अटकपुर्व जामीन मंजुर – धाराशिव कोर्टाचा निकाल, पहिला जामीन

July 3, 2025

‘तो’ साहेब कोण ? कोडं – 4 लाखांचे लाच प्रकरण – आरोपी शेखला आज कोर्टात हजर करणार, दबाव ? ठाण्यातील सीसीटीव्ही तपासण्याची गरज 

July 3, 2025

ड्रग्ज तस्करी गुन्हा – 3 जुलैला सुनावणी, 15 आरोपी फरार, पुरवणी दोषारोपपत्र, कडक कारवाई – पोलिस अधीक्षक खोखर

July 2, 2025
July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp