Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

बदनामीचा आरोप – खासदार ओमराजे निंबाळकर यांना विनोद गंगणे यांनी पाठवली अब्रुनुकसानीची नोटीस, 10 कोटी नुकसान भरपाई द्या

समय सारथी by समय सारथी
December 15, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
1.6k
VIEWS

धाराशिव – समय सारथी 

तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी प्रकरण विधिमंडळ अधिवेशनात गाजत असताना दुसरीकडे खासदार ओमराजे निंबाळकर यांना ड्रग्ज गुन्ह्यातील आरोपी तथा भाजपचे तुळजापूर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनोद गंगणे यांनी अब्रूनुकसानीची नोटीस वकीलामार्फत पाठवली आहे. ओमराजे निंबाळकर यांनी चुकीचे आरोप केले त्यामुळे समाजात प्रतिष्ठा मलीन होऊन बदनामी झाली, अब्रु गेली असे गंगणे यांच्या नोटीसीत म्हण्टले आहे.

व्हिडिओ सोशल मीडियावरून मागे घ्यावा व सार्वजनिक माफी प्रसिद्ध करावी. नुकसान भरपाई पोटी 10 कोटी द्या अन्यथा दिवाणी व फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करू असे म्हण्टले आहे. ऍड अंगद पवार यांच्या मार्फत खासदार ओमराजे निंबाळकर व धाराशिव लाईव्हचे संपादक सुनील ढेपे यांना ही नोटीस पाठवली आहे. नगर परिषद निकाला बरोबर आगामी काळात ड्रग्जवरून राजकीय वातावरण तापणार आहे.

गंगणे यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना पाठवलेल्या नोटीसीत असे म्हण्टले आहे की, विनोद गंगणे हे तुळजापूर येथील राजकीय प्रतिष्ठित व्यक्ती असुन समाजात त्यांना मान असुन त्यांच्याकडे तुळजापूर शहराच्या राजकारणातील महत्वाचा केंद्र बिंदु म्हणुन पाहतात. तामलवाडी येथील गुन्ह्यात त्यांना आरोपी केले आहे. छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने त्यांना जामीन देताना काही बाबींचे निरीक्षक केले आहे त्यात गंगणे हे मादक पदार्थाचे ग्राहक आहेत, त्यांना ड्रग्ज आर्थिक व्यवहारातुन आर्थिक लाभ झाला नाही, त्यामुळे पेडलर, तस्कर नाहीत. त्यांच्याकडुन ड्रग्ज जप्त केले नाही.गंगणे यांनी तपासात केलेले सहकार्य व कोणतीही गुन्हेगारी पुर्व इतिहास नसल्याची नोंद घेऊन आशिलास जामीन मंजुर केला आहे. ते ड्रग्ज तस्करीचे मास्टर माईंड व रॅकेटचा भाग नाहीत असा दावा केला आहे. 

तुळजापूर येथे तिर्थ क्षेत्र विकास आराखड्यासाठी 1865 कोटी रुपये निधी मंजूर झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह पालक मंत्री व ग्राम विकास मंत्री तसेच “मित्र” चे उपाध्यक्षक आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा सन्मान सोहळा आयोजीत करण्यात आला होता, 7 ऑगस्टच्या त्या सन्मान सोहळा समितीचे विनोद गंगणे हे निमंत्रक होते.

जो माणूस हे ड्रग्ज सारखे विष याठिकाणी धाराशिव जिल्ह्यामध्ये आणतोय अनं त्याच्या माध्यमातून तरुण पिढी बरबाद करतोय, अशा प्रकरणात अडकलेल्या माणसाची पाठराखण करण्यासाठी काही माणसं केविलवाणा प्रयत्न करत आहेत, मला आपल्या माध्यमातून एवढेच सांगायचे की, या प्रकरणात जे राणा पाटील सांगतायत की, हे आम्ही उघडकीस आणलं, मला आपल्या माहिती द्यायची आहे की मागची लोकसभेची निवडणूक होण्याच्या पूर्वी वर्षभरापासून राणा पाटलाला माहित होत की, त्याचा कार्यकर्ता ह्या ड्रग्जच्या आहारी गेलाय, ह्या ड्रग्जच्या व्यवहारात आहे, ड्रग्ज सारखे विष या भागात आणून विकणाऱ्या माणसाला त्या ठिकाणी जर आपण पाठीशी घालत असू तर.. अशी बदनामीकारक वक्तव्य केल्याचे नोटीसीत म्हण्टले आहे. 

आशिल गंगणे यांच्या बाबत तो ड्रग्ज विक्रेता असल्याची खोटी विधाने करुन राजकीय प्रतिष्ठा, सामाजिक मानसन्मान बाधीत करण्याचे कृत्य केले. यामुळे व्यक्तीगत, राजकीय, सामाजिक व व्यावसायिक प्रतिमा गंभीर रित्या बाधीत होवून हानी पोहचली आहे. तो व्हिडीओ पाहून अनेक जन म्हणाले की, तुमच्या बद्दल असलेला आमच्या मनातील आदर, स्वच्छ प्रतिमेची भावनेला ठेस पोहचली. त्यामुळे सार्वजनिक जीवनात अतिशय लाजीरवाणी स्थिती निर्माण झाली आहे, त्याचा फार मनस्ताप आमचे आशिलास होत आहे.

माणासाची प्रतिष्ठा ही त्याची मालमत्ता मानली जाते इतर कोणत्याही मालमत्तेपेक्षा अधिक मौल्यवान असते. परंतु खोट्या आरोपातील शब्दामुळे आशिलाच्या प्रतिष्ठेला इजा पोहचली आहे. सदर प्रतिष्ठेला इजा पोहचविण्याची कृतीमुळे कलम 356(1), 356(2), 356(3), 356 (4) भारतीय न्याय संहिता 2023 प्रमाणे गंभीर गुन्हा आहे. सदरचा गुन्हा कायद्यानुसार दंडणीय अपराध तसेच बदनामीच्या नुकसान भरपाईसाठी पात्र आहे असे नोटीसीत नमुद आहे.

बदनामीकारक विधानांचा व्हिडीओ सोशल मिडयावरुन त्वरीत मागे घ्यावा व सार्वजनिक माफी प्रसिद्ध करावी, मानहानी, मानसिक वेदना व त्रासापोटी रुपये 10 कोटी इतकी नुकसान भरपाई 7 दिवसांच्या आत अदा करावी. अन्यथा योग्य त्या न्यायालयात फौजदारी व दिवाणी खटला दाखल करतील, नोटीसचा खर्च 15 हजार तुमच्याकडून वसूल केला जाईल असे नोटीसीत नमुद आहे.

खासदार ओमराजे निंबाळकर यांची प्रतिक्रिया –

तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात विनोद गंगणे हा 38 आरोपी पैकी एक मुख्य आरोपी आहे. पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्यानंतर पोलिस कोठडी व जिल्हा न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजुर केला आहे. गंगणे याने स्वतःच्या व इतरांच्या नावाने लाखो रुपयांचे ड्रग्ज एकाचवेळी वारंवार घेतले आहे, त्यासाठी शांत डोक्याने गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचला. ड्रग्ज याच्यामुळेच तुळजापुरात पसरले हे सगळे पोलिस तपासात आहे.

कोर्टात दोषारोप पत्र अजून गेले नाही पोलिस तपास सुरु आहे, कोर्टातील मुद्दे, पोलिसांनी जो तपास केला त्यावर आधारित मी बोललो, नोटीसीला योग्य ते उत्तर देऊ, आता ही कायदेशीर प्रक्रिया आहे, असे खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले. ड्रग्ज माफिया मोकाट, माध्यमावर दबाव, काही जणांना अभय असे सुरु आहे याबाबत कैलास पाटील यांनी विधिमंडळ अधिवेशनात आवाज उठवला आहे.

Previous Post

लक्षवेधी, बदनामीचे षडयंत्र – तुळजाभवानी महंतांच्या तक्रारीचा आधार, मुख्यमंत्र्याकडे तक्रार

Next Post

सर्वोच्च विजय – सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली, अमित शिंदे यांच्या बाजुने पुन्हा एकदा निकाल

Related Posts

महाराष्ट्र

डॉ आंबेडकर जयंती विशेष – ‘दिलखुलास व ‘जय महाराष्ट्र’ समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडेंची मुलाखत

April 13, 2026
महाराष्ट्र

बरखास्त, सुचक – शिवसैनिकांनी घेतली खा श्रीकांत शिंदे यांची भेट, मांडल्या व्यथा – पोस्टने खळबळ

April 13, 2026
महाराष्ट्र

भाडे मागितले, मिळाले सत्तूरचे वार – कोयत्याने हल्ला, 26 टाके, गंभीर जखमी – धाराशिव येथील घटना

April 13, 2026
महाराष्ट्र

परवाना कायमस्वरूपी रद्द, सील करण्याचे आदेश – महाकाली कला केंद्र अखेर बंद होणार, जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

April 13, 2026
महाराष्ट्र

आर्थिक व्यवहार, त्याच कंपनीला तीर्थक्षेत्राचे 436 कोटींचे काम देण्याचा घाट – महाविकास आघाडी

April 13, 2026
महाराष्ट्र

उच्च न्यायालयाचा आदेश, स्थगिती उठवली – महाकाली कला केंद्र, सील करण्याचा मार्ग मोकळा – याचिका मागे, कारवाईकडे लक्ष

April 13, 2026
Next Post

सर्वोच्च विजय - सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली, अमित शिंदे यांच्या बाजुने पुन्हा एकदा निकाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

डॉ आंबेडकर जयंती विशेष – ‘दिलखुलास व ‘जय महाराष्ट्र’ समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडेंची मुलाखत

April 13, 2026

बरखास्त, सुचक – शिवसैनिकांनी घेतली खा श्रीकांत शिंदे यांची भेट, मांडल्या व्यथा – पोस्टने खळबळ

April 13, 2026

भाडे मागितले, मिळाले सत्तूरचे वार – कोयत्याने हल्ला, 26 टाके, गंभीर जखमी – धाराशिव येथील घटना

April 13, 2026
April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp