धाराशिव – समय सारथी
खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील हल्लाबोल करीत टीका करीत शिकवण घेण्याचा सल्ला दिला आहे. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांना जाऊन भेटायला हवे. एखादा मोठा प्रकल्प कश्या पद्धतीने केला जातो याची शिकवण घ्यायला हरकत नाही. शिकवणी झाल्यानंतर त्यांच्याशी बोलू असे सांगत सल्ला दिला.
जनतेची सेवा करण्याची कोणतीही संधी मिळाली की त्यांचा योग्य वापर मी करतो असे आमदार पाटील यांनी सांगितले.
आमदार राणा यांचे विकास प्रकल्प व मॉडेल हे फक्त कम्पुटर व पीपीटी पुरते मर्यादित असतात, प्रत्यक्षात काही काम होत नाही अशी टीका खासदार ओमराजे यांनी केली होती त्याला उत्तर देताना आमदार राणा यांनी ओमराजे यांना ठाकरे यांच्याकडे शिकवणी घेण्याचा सल्ला दिला.