धाराशिव – समय सारथी
तुळजाभवानीच्या मंदिरात आता पुण्यातील प्रसिद्ध चितळे बंधूच्या मोतीचूर लाडूचा प्रसाद दिला जाणार आहे. तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादाप्रमाणेच आई तुळजाभवानी मंदिरात हा लाडूचा प्रसाद दिला जाणार असल्याची माहिती तुळजाभवानी मंदिर संस्थांचे अध्यक्ष तथा धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर कीर्ती किरण पुजा यांनी ही माहिती दिली आहे.
प्रसादाबाबत नामांकित कंपन्याला देखील बोलवण्यात आले होते, मंदिर संस्थांच्या मागणीप्रमाणे त्यांनी पुरवठा करण्याची टेंडर पद्धतीने पुण्यातील चितळे बंधू यांना हा मान मिळाला असून लवकरच चितळे बंधूंचा प्रसाद तुळजाभवानीच्या भाविकांना मिळणार आहे. लाडू कसा असावा, त्याच्या रेसिपीबाबत लवकरच निर्णय होणार आहे.