सर्वसाठी चर्चेची दारे खुली, 5 पक्षांचा चालक, राणा पाटलांवर आमदार तानाजीराव सावंतांची टीका
धाराशिव – समय सारथी
शिवसेना नेते आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत यांनी भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर विविध मुद्यावर घणाघाती टीका केली. तुळजाभवानी मंदीर विकास व गाभाऱ्यावरून त्यांनी निशाणा साधला. रझाकाराची औलाद छातीवर नाचत असताना तुम्ही गप्प कसे ? तुळजाभवानीचे पवित्र्य नष्ट करण्याचे पाप केले, त्याचे फळ मिळेल. तत्व व नियतीचा अभाव असल्याने त्यांच्या रक्तात गद्दारी आहे. युतीची सत्ता गेली की ते पहिल्यांदा पक्ष बदलून उडी मारणार हे वास्तव आहे. मुळं भाजप पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर विरोधात तक्रार नसुन त्यांचे आमचे रक्त एक आहे मात्र ह्यांच्या विचारात खोटं आहे. उंट, बेडूक अशी उपमा देत सावंत यांनी टीका केली.
राणाजगजीतसिंह पाटील हे धाराशिव जिल्ह्यात 5 पक्ष चालवतात. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत सर्व पक्षासाठी चर्चेची दारे खुली असुन जशी भुम परंडामध्ये झाले तसे सगळे पक्ष माझ्या सोबत आले तरी त्यांचे स्वागत आहे असे आमदार सावंत म्हणाले. त्यामुळे जिल्हा परिषदेत नवीन राजकीय समीकरण येऊ शकते असे संकेत त्यांनी दिले.
माजी आरोग्यमंत्री विकासरत्न आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली भैरवनाथ शुगर वर्क्स संचालित ढोकी येथील तेरणा कारखाना परिसरात विजयी संकल्प व शेतकरी मेळावा पार पडला त्यावेळी ते बोलत होते. मेळावा यशस्वी केल्यामुळे त्यांनी आयोजक व सर्व सहकारी यांचे अभिनंदन करीत कौतुक केले.
मुळं भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक विरोधात माझी तक्रार नाही, ते शिवसेनेला विरोध करीत नाहीत कारण त्यांचे आमचे रक्त एक आहे. खोटं विचारात व रक्तात आहे. एक उंट भाजपने आपल्या पक्षात घेतला मात्र सत्तातर झाले की हा उंट पहिल्यांदा दुसऱ्या मंडपात जाणार, हे भाजपने ओळखले पाहिजे. विचाराची खोटं, नियतीतील अशुद्धता ओळखता आली नाही हे त्यांचे यश व तुमचे अपयश आहे हे पहिले मान्य करा असा सल्ला दिला.
एका मतदार संघा पुरता मर्यादीत असलेला भाजपचा आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी ऐकला चलो रे अशी घोषणा केली. शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याने अशी भाषा केली नाही कारण आमच्या पक्षात शिस्त आहे, आमच्याकडे आदेश चालतो, व्याख्याने नाही. पक्षाने काही सांगितले नाही म्हणुन आम्ही कोणीही भाष्य केले नाही. आम्ही हाडाचे शिवसैनिक असुन मागे लागत नाहीत. भुम परंडा येथे भाजप, अजित पवार व शरद पवार राष्ट्रवादी, काँग्रेस हे सगळे पक्ष सावंत यांना थोपवून ठेवण्यासाठी एकत्र आले व युती केली.
हाताची 5 बोटे तुपात, यांचे नशीब बलवत्तर आहे. भाजप तेच चालवतात, राष्ट्रवादीशी नाते गोते, शिवसेनेतील गद्दारांचा एक गट त्यांच्या खिशात, ह्यांचे सगळे एबी फॉर्म यांच्याकडे मग राहिला कोणता पक्ष ? काँग्रेसचे हस्यास्पद झाले आहे. वंदनीय मधुकरराव चव्हाण यांनी 30 वर्ष एकट्याने हा किल्ला लढवला मात्र कशामुळे ते सरेंडर झाले हे त्यांनाच विचारा. युती की आघाडी हा विषय राहिला नाही. 5 पक्ष घेऊन हा एकटा माणुस चालतो, तो कुठल्याच पक्षाचा नसतो कारण गद्दारी ही रक्तता आहे, तत्व व नियत यांचा अभाव असलेली ही माणसे असुन त्यांना विचार नाही. महायुती सत्ता गेली किंवा अडचण आली व महाविकास आघाडी किंवा नवीन राजकीय समीकरण आले की पाहिली उडी मारणारे हे बेडूक असेल अशी टीका केली.
एक नेता सकाळी अर्धा तास मोबाईलवर येतो आणि काहीही बोलतो, हे मी 2 वर्ष पाहत आहे. धावपट्टी करणार, बॉईन्ग विमान येणार त्याचे काय करायचे? चाटायचं आहे का ? शेतकरी यांच्या मुलींचे लग्न, शिक्षण, आरोग्य यासाठी पैसा नाही. चोरायची त्यांना सवय आहे, धाराशिव विमानतळ धावपट्टी वाढीबाबत पहिले पत्र मी दिले असे ते म्हणाले.
आपणं हिंदू आहोत, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे पवित्र्य आहे, नवरात्र आपण कडक व्रत पाळतो, शिवता शिवत होऊ नये म्हणुन काळजी घेतो मात्र आता कुठली 4 लोक गाभाऱ्यात जात आहेत. भ्रष्टाचार करायचा. आमदार म्हणत आहेत मंदिराचे शुशोभीकरण केले, काय करायचे ते बाहेर विकास करा. गाभाऱ्याला कशाला हात लावता ते पवित्र्य राहणार आहे का? हे शक्तीपीठ आहे, त्याचा आदर पवित्र्य राखले पाहिजे मात्र त्याला ठेचं लागली आहे याची खंत व खेद वाटतो त्यामुळे आत्मचिंतन करायची गरज आहे असे सावंत म्हणाले.
मी पालकमंत्री असताना 2 वर्ष ही फाईल माझ्याकडे प्रलंबित होती त्यावेळी मी सांगितले होते की जें काही करायचे आहे ते करा मात्र गाभाऱ्याला हात लावू नका कारण आमच्या निष्ठेचा प्रश्न आहे. आमच्या देवीचे ते सिंहासन आहे, तिथे शिवता शिवत नको, ते सोडून सगळं मान्य आहे म्हणुन मी सही केली नाही. नवीन सरकार आले तेव्हा भाजपचे मुख्यमंत्री झाले तेव्हा 8 दिवसात मंजुरी घेऊन गुलाल उधळला. पवित्र्य नष्ट करण्याचे पाप केले त्याची फळे त्यांना परमेश्वर देईल असे सावंत म्हणाले.
इतकी विटंबना होणे मान्य नाही, याचे कारण काय ? याचा रागही येतो व तुमचे चेहरे बघितले की त्याचं वाईटही वाटत कारण रझाकाराची ही औलाद तुमच्या छातीवर नाचत असताना आपण गप्प कसे? हा त्यांचा की आपला दोष आहे. असे काय आहे ज्यामुळे त्यांची वेठबिगारी करावी लागते, कोणती गोष्ट आहे त्याचा त्रास होतोय. याच्या सारखे 10 जण जरी आले, कोणतेही संकट आले तरी हा तानाजी सावंत छातीचा कोट करून समोर उभे राहणार असे मी वचन देतो. मी बघतो त्याच्यात किती दम आहे ते असे म्हणत आव्हान दिले.












