लग्नासोबत नौकरीची संधी – 26 वर्षापासुन डॉ तानाजीराव सावंत परिवाराचा उपक्रम
धाराशिव – समय सारथी
ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या मुला मुलींची मोफत लग्न करण्याची जबाबदारी पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी घेतली असुन 1998 पासुन गेल्या 26 वर्षात 2 हजारपेक्षा अधिक मुलींचे त्यांनी कन्यादान केले आहे. शेतकऱ्यांच्या मुलीला स्वतःची लेक मानून ते सामुदायिक विवाह सोहळ्यात कन्यादान करीत त्यांना माहेरचा आहेर देखील देतात. लग्नासोबतच ज्या वधू वरांचे शिक्षण झाले आहे व त्यांना नौकरी, व्यवसाय करण्याची इच्छा आहे त्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नौकरी देऊन त्यांच्या कुटुंबाला स्थिरता दिली आहे. व्यवसायात मदत करुन रोजगार उपलब्ध करुन दिला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी कुटुंबाला जयवंतराव सावंत प्रतिष्ठानने मदतीचा हात दिला आहे. विविध जाती धर्मातील जवळपास 2 हजार पेक्षा अधिक मुलींचे मोफत सामूहिक विवाह सोहळा करुन आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना धीर दिला. धाराशिव जिल्ह्यात कधी सततचा दुष्काळ तर कधी गारपीठ व नापिकीचे नैसर्गिक संकट कायम असते. निसर्गाच्या या अवकृपेमूळ येथील शेतकऱ्याच अर्थकारण पुरते कोलमडुन जाते, याच आर्थिक विवंचनेतुन अनेक शेतकरी आत्महत्यासारख टोकाच पावुल उचलतात. दुष्काळाच्या बिकट स्तिथित हातात पैसा नसल्याने मुला मुलींची लग्न कशी करावी हा प्रश्न भेडसावत असताना जयवंतराव सावंत प्रतिष्ठानने या शेतकऱ्यांना धीर दिला.
धाराशिव जिल्ह्यातील सर्व जाती धर्माच्या 2 हजार जोडप्यांचा सामूहिक विवाह करुन देवून लग्न करण्याचा प्रश्न सोडवला आहे . परंडा येथील भैरवनाथ साखर कारखान्याच्या परिसरात भव्य मंडपात हा विवाह सोहळा दर वर्षी पार पडतो, 1998 पासुन या विवाह सोहळ्यांचे आयोजन केले जात आहे. जयवंतराव सावंत प्रतिष्ठानने लग्नाचा सपूर्ण खर्च , व्हराडी मंडळीचे जेवन व संसार उपयोगी साहित्य देवून नविन जोडप्याच्या संसाराला आधार दिला. एरव्ही सिनेमात दिसणारे अभिनेते महेश मांजरेकर,अभिनेत्री अलका कुबल,निशिगंधा वाड, पूजा पवार यांसह अन्य अभिनेते अभिनेत्री यांच्या उपस्थितीमुळे हे विवाह सोहळे शेतकरी कुटुंबातील जोडप्यासाठी संस्मरणीय ठरले आहेत.
लग्न करायच म्हणटलं की किमान 2 ते 3 लाख रुपयांचा खर्च होतोच शिवाय वाढत्या महागाईमूळ व नव नविन फॅशनमुळे हा खर्च शेतकरीला परवडत नाही मग लग्न करण्यासाठी कर्ज काढले जाते व ते न फेडता आल्याने आत्महत्या … असे हे चक्र ग्रामीण भागात पहायला मिळत होते त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जयवंतराव प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रा डॉ तानाजीराव सावंत व प्रा शिवाजीराव सावंत या दोन्ही बंधूनी जिल्ह्यात मोफत विवाह सोहळे आयोजित केले. कन्यादान असे त्यांनी या योजनेला नाव दिले. या मोफत विवाह सोहळ्याने शेतकऱ्याला कर्जाबाजारी होण्याच्या संकटातुन वाचवले. सिनेकलावंत, राजकीय नेत्यांची हजेरी व जेवनाची मेजवानी या अनपेक्षित गिफ्टमुळे अनेक जोडपी सुखवली आणि त्यांनी नव्या आयुष्याला दमाने सुरवात केली आहे.
सावंत कुटुंबातील 11 मुलांचे विवाह, सामाजिक जबाबदारी पार
सामूहिक विवाह सोहळ्यात मुस्लिम,बौद्ध व हिंदू या तिन्ही धर्मातील जोडप्यांचा विवाह त्या त्या धर्मातील रिती, परंपरेनुसार करण्यात येतो. स्वतः पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत व त्यांचे बंधु प्रा शिवाजीराव सावंत हे कन्यादान करतात व मुलीला माहेरचा आहेर भेट देतात. वधुस शालू, मणी मंगळसुत्र, वरास सफारी, टोपी व संसार उपयोगी साहित्य वाटप केले जाते. सावंत यांनी त्यांच्या कुटुंबातील 11 मुलांचे विवाह या सामुदायिक विवाह सोहळ्यात लावले हे विशेष.विवाह सोहळ्यासाठी जवळपास 25 हजार पेक्षा अधिक वराडी मंडळी उपस्थित असतात त्यांच्या मानपानाची व्यवस्था सावंत परिवार करतो. सावंत परिवारातील सर्वजण मुलीला सासरी वाटे लावेपर्यंत थांबून प्रेमाने लाडक्या लेकीला निरोप देतात.