मुंबई – समय सारथी
मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र या मोहिमेला 9 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असुन 1 लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचा संकल्प आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी केला आहे त्यानुसार आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. महाआरोग्य शिबीर नंतर हा एक मोठा उपक्रम ठरणार आहे.19 फेब्रुवारी ते 4 मार्च दरम्यान मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र पंधरवडा राबविण्यात आला मात्र लोकांचा प्रतिसाद व रुग्णांची संख्या यामुळे अभियानाला 9 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
डोळ्यातील लेन्स धुसर किंवा पांढरा होणे म्हणजे मोतीबिंदु होय. कोणत्याही प्रकारची वेदना न होता दृष्टी कमी होत जाणे. चशम्याचा नंबर बदलणे. मोतीबिंदूचा वयोमानानुसार दोन्ही डोळ्यावर प्रभाव पडतो. मोतीबिंदूवर कृत्रिम भिंगारोपण हा पर्याय उपलब्ध आहे. शासकीय रुग्णालयात व मान्यता प्राप्त स्वयंसेवी संस्था रुग्णालयात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केला जाणार आहेत. शस्त्रक्रियेसाठी आशा, आरोग्य कर्मचारी व शासकीय रुग्णालयात संपर्क साधावा असे आवाहन आरोग्यमंत्री डॉ सावंत यांनी केले आहे. मोफत सल्लासाठी 104 टोल फ्री सेवा सुरु केली आहे.
राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी शिणता नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत राष्ट्रीय नेत्र ज्योती अभियान राबविण्यात येणार असुन मोतीबिंदु मुक्त महाराष्ट्र केला जाणार आहे. मोतीबिंदुने गेली दृष्टी कृत्रिम भिंगारोपणाने पहा सृष्टी असा नारा देत हे अभियान राबविले जात आहे.