धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात आरोपी विनोद गंगणे यांना धाराशिव येथील कोर्टाने न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर त्यांनी जामिनीसाठी अर्ज केला असुन त्यावर 20 जुनला सुनावणी होणार आहे. कोर्टाने जिल्हा सरकारी वकील व तपास अधिकारी यांचे जामीनावर म्हणणे मागितले असुन त्यानंतर सुनावणी होणार आहे. दरम्यान गंगणे यांच्यावर धाराशिव जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे वैद्यकीय कारणाने उपचार सुरु आहेत.
कोर्टात 4 आरोपींच्या जामीन अर्जावर 16 जुनला सुनावणी झाली व पुढील तारीख देण्यात आली. तस्कर गटातील फरार उदय शेटे यांच्या अर्जावर 17 जुन, सेवन गटातील फरार आरोपी जगदीश कदम 20 जुन, सेवन गटातील जेलमधील आबासाहेब पवार 20 जुन व माजी सभापती शरद जमदाडे यांच्या अर्जावर 19 जुनला जिल्हा व सत्र न्यायाधीश टी जी मिटकरी यांच्या कोर्टात सुनावणी होणार आहे तर नियमित सुनावणी 17 जुनला होणार आहे.
दोषारोप पत्रात सेवन गटात असलेल्या आरोपींचा पोलीस तपासात सहभाग वाढला असुन कलम 29 मुळे जामिनीस अडचणीत वाढ झाली आहे. जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख हे बाजु मांडत आहेत तर सपोनि गोकुळ ठाकुर हे तपास करीत आहेत.
ड्रग्ज तस्करीत 37 आरोपी असुन 20 जण अटकेत असुन 16 जन फरार आहेत तर अलोक शिंदे यांना अटकपुर्व जामीन मिळाला आहे. फरार आरोपींचा शोध पोलिसांची विविध पथक घेत आहेत, आणखी 1 आरोपी निष्पन्न झाला आहे. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात 15 आरोपींची जामीन कोर्टाने नाकारली असुन अलोक काकासाहेब शिंदे या एकाला अटकपूर्व जामीन दिली आहे.