Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

सहभाग वाढला – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत गंगणे यांचा जामीन नाकारला, जेलमध्ये मुक्काम – धाराशिव कोर्टाचा निकाल

समय सारथी by समय सारथी
June 20, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
86
VIEWS

धाराशिव – समय सारथी

तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी गुन्ह्यातील आरोपी विनोद गंगणे यांचा जामीन अर्ज धाराशिव येथील कोर्टाने फेटाळला असुन कोर्टाने जामीन देण्यास नकार दिला आहे. वैद्यकीय कारण देत गंगणे यांनी यापुर्वी 2 वेळेस जामीन अर्ज दाखल केला होता तो फेटाळण्यात आला त्यानंतर नियमित अर्ज देखील जिल्हा व सत्र न्यायाधीश टी जी मिटकरी यांनी फेटाळत जामीन नाकारला. गंगणे यांचा ड्रग्ज तस्करीतील सहभाग वाढला असुन त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पोलिसांनी लेखी म्हणणे मांडत गंगणे यांच्या जामिनीला विरोध केला तर सरकारी सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख यांनी कोर्टात सक्षमपणे बाजु मांडली.

गंगणे यांचा जामीन 6 जुन रोजी नाकारल्यानंतर त्यांना पोलिसांनी अटक केली, त्यानंतर त्यांना 9 जुन पर्यंत व वाढीव 12 जुनपर्यंत पोलिस कोठडी दिली. पोलिस कोठडी दिल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली, वैद्यकीय कारणाने 3 दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर गंगणे यांची धाराशिव जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली.जामीन नाकारल्याने गंगणे यांचा धाराशिव जिल्हा कारागृहातील मुक्काम वाढला आहे. पोलिसांनी तपास करताना गंगणे यांच्या बाबतीत ठोस कागदपत्रे जमा करीत ती कोर्टात सादर केली. गंगणे यांना अटक केल्यानंतर सोलापूर येथील पिंटू सुर्वेला अटक केली. 

ड्रग्ज तस्करी गुन्ह्याचे स्वरूप, उपलब्ध पुरावे व गंगणे यांचा या गुन्ह्यातील सहभाग याबाबत ऍड महेंद्र देशमुख यांनी बाजु मांडली. गंगणे यांनी ड्रग्ज सेवनाला प्रोत्साहन दिले, गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचून ड्रग्ज खरेदी केली व त्याची साठवणूक केली त्याचा सहभाग हा मोठा असुन त्यामुळे तुळजापूर येथील अनेक तरुणांना व्यसन लागले असा युक्तिवाद ऍड देशमुख यांनी केला. गंगणे यांचे इतर आरोपी सोबत असलेले आर्थिक व्यवहार, संभाषण व इतर पुरावे मिळाले असुन सहभागी वाढला आहे असे सांगत ऍड देशमुख यांनी कलम 29 कोर्टात वाचून दाखवले. गंगणे यांचे गुन्ह्यात नाव आल्यावर त्यांनी 2 मोबाईल गहाळ झाल्याची तक्रार केली, हे कृत्य त्यांची गुन्हेगारी मानसिकता दर्शवते, पोलिस कोठडीतील जास्त काळ रुग्णालयात गेला त्याकाळात 2 मोबाईल दिले नाहीत, त्यांची गुन्हेगारी पार्शवभूमी हे मुद्दे अडचणीचे ठरत आहेत.

विनोद गंगणे हे पोलिसांचे खबरी असुन त्यांनी ड्रग्ज तस्करी गुन्ह्याची टीप पोलिसांना दिली, त्यामुळे आरोपी अटक झाले व रॅकेटचा भांडाफोड झाला. ते व्यसनमुक्त झाले असुन त्यांचा सहभाग केवळ सेवनापुरता मर्यादित असल्याचे गंगणे यांचे वकिल श्रेयश गवळी यांनी कोर्टात सांगितले. गंगणे यांनी जे 12 लाखांचे ड्रग्ज खरेदी केले ते स्वतःसाठी सेवनासाठी होते त्यांनी विक्री केली नाही असे ते म्हणाले. वैद्यकीय कारण असल्याने जामीन अर्ज लवकर निकाली काढत जामीन द्यावा अशी मागणी गंगणे यांच्या वकिलांनी केली.

तुळजापूर ड्रग्ज तस्करीत 38 आरोपी असुन त्यातील 21 जण अटकेत असुन 16 जन फरार आहेत तर अलोक शिंदे यांना अटकपुर्व जामीन मिळाला आहे. फरार आरोपींचा शोध पोलिसांची विविध पथक घेत आहेत, आणखी काही आरोपी निष्पन्न होण्याची यानिमित्ताने शक्यता आहे. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात 15 आरोपींची जामीन कोर्टाने नाकारली आहे. पोलिस अधीक्षक रितु खोकर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गोकुळ ठाकुर हे तपास करीत आहेत.

धाराशिव कोर्टात 6 आरोपींचे जामीन अर्ज प्रलंबित आहेत. त्यात 21 जुन रोजी तस्कर गटातील फरार आरोपी उदय शेटे, सेवन गटातील जेलमधील आरोपी आबासाहेब पवार यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. 24 जुनला सेवन गटातील माजी सभापती शरद जमदाडे व जेलमधील अटक आरोपींची नियमित सुनावणी होणार आहे. 25 जुनला सेवन गटातील फरार आरोपी जगदीश कदम पाटील व 27 जुनला रणजित पाटील यांच्या अर्जावर सुनावणी होणार आहे. 

Previous Post

विनोद गंगणे यांचा जामीन नाकारला – धाराशिव कोर्टाचा निकाल, जेलमधील मुक्काम वाढला 

Next Post

धाराशिव नगर परिषद घोटाळा – वर्ष उलटले तरी एसआयटी चौकशी नाही, नोडल अधिकारी नेमा – आमदार सुरेश धस यांचे पोलिस अधीक्षकांना पत्र 

Related Posts

महाराष्ट्र

धाराशिव नगर परिषद घोटाळा – वर्ष उलटले तरी एसआयटी चौकशी नाही, नोडल अधिकारी नेमा – आमदार सुरेश धस यांचे पोलिस अधीक्षकांना पत्र 

June 20, 2025
महाराष्ट्र

विनोद गंगणे यांचा जामीन नाकारला – धाराशिव कोर्टाचा निकाल, जेलमधील मुक्काम वाढला 

June 20, 2025
महाराष्ट्र

2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार – 79 वर्षीय आरोपीस 5 वर्षाची शिक्षा, कोर्टाचा निकाल

June 19, 2025
महाराष्ट्र

हे त्यावेळी का लक्षात आले नाही ? धाराशिव कोर्टाने पोलिसांना पुन्हा एकदा सुनावले – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत दबाव ?

June 19, 2025
महाराष्ट्र

पोलिस कोठडी – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत सोलापूर येथील पिंटू सुर्वे अटकेत, आरोपींची संख्या 38

June 19, 2025
महाराष्ट्र

अटक – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत एक जण जाळ्यात, सोलापूर येथील 38 वा आरोपी निष्पन्न

June 19, 2025
Next Post

धाराशिव नगर परिषद घोटाळा - वर्ष उलटले तरी एसआयटी चौकशी नाही, नोडल अधिकारी नेमा - आमदार सुरेश धस यांचे पोलिस अधीक्षकांना पत्र 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

धाराशिव नगर परिषद घोटाळा – वर्ष उलटले तरी एसआयटी चौकशी नाही, नोडल अधिकारी नेमा – आमदार सुरेश धस यांचे पोलिस अधीक्षकांना पत्र 

June 20, 2025

सहभाग वाढला – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत गंगणे यांचा जामीन नाकारला, जेलमध्ये मुक्काम – धाराशिव कोर्टाचा निकाल

June 20, 2025

विनोद गंगणे यांचा जामीन नाकारला – धाराशिव कोर्टाचा निकाल, जेलमधील मुक्काम वाढला 

June 20, 2025
June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp