धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुक निकालानंतर चित्र स्पष्ट झाले असुन 55 जागा पैकी 19 जागावर भाजपने विजय मिळवीत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. महायुतीतील शिवसेना शिंदे गटाला 15 जागा, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 6 जागा मिळाल्या आहेत. शिवसेना उबाठा गटाला 7, 3 काँग्रेस, 4 अपक्ष, 1 समाजवादी पार्टीला मिळाली आहे. महायुतीला 40 जागा मिळाल्या असुन स्पष्ट बहुमत मिळाले आहे. महाविकास आघाडीला 10 व अपक्ष 4 व 1 समाजवादी पार्टी असे संख्याबळ आहे. धाराशिव जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण होणार याकडे आता लक्ष लागले आहे.









