धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर पालिकेअंतर्गत झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याबाबत विशेष तपास पथकाची स्थापना होऊनही अद्यापपर्यंत कसल्याही प्रकारची चौकशी किवा कारवाई न झाल्याने एसआयटीच्या कामकाजासाठी एक नोडल ऑफिसर नियुक्त करावे असे पत्र आमदार सुरेश धस यांनी पोलिस अधीक्षक यांना दिले आहे.
धाराशिव नगर परिषदेअंतर्गत झलेल्या 27 कोटीच्या घोटाळ्यांसंदर्भात आमदार सुरेश धस यांनी विधानपरिषद प्रश्न क्र 21682 नुसार प्रश्न उपस्थित केला होता त्या अनुषंगाने सभागृहात चर्चा देखील करण्यात आली होती सदरील मोजमाप पुस्तिका गहाळ प्रकरणी दाखल गुन्ह्यामध्ये कसल्याही प्रकारची चौकशी करण्यात आली नाही.ही गंभीर बाब आहे असे पत्रात म्हणटले आहे.

चर्चेदरम्यान तत्कालीन उपमुख्यमंत्री (गृह) व सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात आश्वासन दिल्याप्रमाणे शासनाने SIT) 7 जुन 2024 रोजी स्थापन केलेली आहे तरी अद्यापपर्यंत त्याचा अहवाल किवा त्याची चौकशी चा प्रगती अहवाल सुद्धा मला किवा सभागृहाला सादर नाही ही बाब खेदाची आहे. या SIT संदर्भात अद्यापापर्यंत कसल्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही ही गंभीर बाब आहे असे धस यांच्या पत्रात म्हण्टले आहे. एक नोडल ऑफिसर नियुक्त करण्यात यावा व धाराशिव नगर परिषदेमधील कोट्यवधीच्या घोटाळ्यासंदर्भात विशेष लक्ष घालून त्याचा अहवाल पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वी शासनास सादर करावा अशी मागणी केली आहे.