कळंब – समय सारथी, अमर चोंदे
धाराशिव जिल्ह्यात गांजा शेती करणाऱ्या विरोधात पोलिसांनी कारवाईची मोहीम उघडली असुन कळंब तालुक्यातील पानगाव येथे गांजा शेती उघड केली आहे. गोपनीय माहिती आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
येरमाळा पोलिसांनी पोलीस अधीक्षक रितु खोकर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि तात्याराव भालेराव यांनी व यांच्या टीमने पानगाव येथील बाबासाहेब वाघमारे यांचे सदरचे शेतात कारवाई केली. जप्त केलेल्या झाडाची किंमत 1 लाख 41 हजार इतकी आहे.
या प्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर लागवड करू नये, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल असे आवाहन करण्यात आले. कारवाईत पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल भोजगुडे, पोलीस उपनिरीक्षक आवारे, तानाजी काळे, पोकॉ. किरण शिंदे, रवींद्र कांबळे, निलेश जाधव यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.











