धाराशिव – समय सारथी
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे हे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी धाराशिव जिल्ह्यात येत आहेत. 4 फेब्रुवारी रोजी लोहारा येथील बसवेश्वर मैदानात दुपारी 12 वाजता ही प्रचार सभा होत आहे. पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली ही सभा होत असुन शिवसेनेचे नेते या सभेला उपस्थितीत राहणार आहेत.
माजी आमदार ज्ञानराज चौगुले, तुळजापूर व उमरगा लोहारा जिल्हा प्रमुख मोहन पनूरे, युवा सेना जिल्हा चिटणीस आनंद पाटील हे या सभेचे नियोजन करीत आहेत. लोहारा तालुक्यात शिवसेना कानेगाव येथून सुवर्णा सतीश पाटील, माकणी सरोजा विजय पाटील व जेवळी येथून श्रुती मोहन पनूरे अश्या 3 जागा लढवीत आहे.
तुळजापूर तालुक्यातील शहापूर ही एकमेव जागा लढत आहे, त्या जागेवर पुणे येथील मारणे टोळीचा शार्प शुटर अशी गुन्हेगारी जगतात ओळख असलेला सुनील बनसोडे हा रिंगणात उतरवला आहे. बनसोडे याने भाजपकडुन सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र शिवसेनेने विश्वास दाखवीत उमेदवारी दिली, हा चर्चेचा विषय ठरला आहे.
उमरगा तालुक्यात सेनेला 9 पैकी 2 जागा मिळाल्या असुन कवठा येथून सिद्धेश्वर रघुनाथ माने व कदेर येथून उषा रवींद्र गायकवाड ह्या लढवीत आहेत.
धाराशिव जिल्ह्यात अधीकांश ठिकाणी महायुती झाल्याचा दावा करण्यात आला असुन 55 पैकी 23 जागा शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावर लढत आहे. त्यात परंडा 5, वाशी 3 व भुम 5 अश्या सर्व 13 ठिकाणी भाजप व शिवसेना उमेदवार आमने सामने आहेत. भुम परंडा वाशी येथे शिवसेना भाजप महायुती फिस्कटली आहे, त्या 13 जागा व माकणी येथे मैत्रीपुर्ण लढत होत आहे. अश्या 14 जागा महायुती असली तरी एकमेका विरोधात लढत आहे. महायुतीसह शिंदे आणखी कोणत्या मुद्यावर बोलतात याकडे लक्ष लागले आहे.












