धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्याच्या युवक काँग्रेस पदाच्या निवडीवरून वादंग पेटले असुन जिल्हाध्यक्ष अश्लेष मोरे याची निवड चुकीच्या पध्दतीने करण्यात आली असुन ती तात्काळ चार दिवसात स्थगित करावी अन्यथा पक्षाचा व पदाचा राजीनामा देण्याचा इशारा युवक काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी दिला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी गेली अनेक वर्षापासुन पक्ष वाढीसाठी आहोरात्र मेहनत करत असून सर्वांनी युवक काँग्रेस निवडनुक प्रक्रियेतून पक्षाला लाखो नोंदनीयुक्त सभासद निवडनुक प्रक्रीयेतुन दिलेले आहेत.
सदरील या जिल्ह्यातील निवड प्रक्रीया ही युवक काँग्रेसच्या नियमानुसार झालेल्या आहेत.सर्व पदाधीकारी यांनी आपल्या जिवाचे रान करून आर्थीक झळ बसवुन पद मिळविलेली आहे तर काहींनी आपली शेत जमीन विकुन एकमेकांच्या विरोधात मते मिळून पद मिळविलेली आहेत तरी युवक काँग्रेसचे नुतन जिल्हाध्यक्ष मोरे हे काँग्रेसच्या कुठल्याही प्रक्रीयेत नसतानाही आणि ते जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीस (फादरबॉडी) हे पदावर असताना वशिलेबाजीने धाराशिव जिल्ह्यातील युवक काँग्रेसच्या पदाधिकार्यांना विचारत न घेता त्यांची निवड केल्याचा आक्षेप घेतला आहे.
जिल्ह्याचे माजी मंत्री, जिल्हाध्यक्ष, जिल्हा संघटक, माजी जिल्हाध्यक्ष, युवक काँग्रेस महासचिव व युवक काँग्रेसच्या सर्व पदाधिकार्यांना विचारत न घेता त्यांची निवड केली आहे. महाराष्ट्र प्रभारी यांना औसा तालुक्यातील वरिष्ठ पदाधीकार्यांनी संगणमत करून युवक काँग्रेस जिल्हाध्यक्षपद दिले आहे.
नवनियुक्त धाराशिव अध्यक्ष हे युवक काँग्रेसचे साधे सदस्य ही नाहीत व सध्या विधान सभेच्या कार्यकारणीतही नाहीत अशा व्यक्तिला आयवायसीच्या नियमानुसार जिल्हाध्य करता येत नसतानाही सदरील अवैद्य निवड झालेली आहे.याबाबत आम्ही प्रदेशाध्यक्ष यांना विचारणा केली असता त्यांनीही या पदाबद्दल माहीती नसल्याचे त्यांनी सांगितले
जिल्ह्यातील वरिष्ठ फादर बॉडी जिल्हाध्यक्ष यांनाही याची माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले जर अचानकपणे असे कोणीपण येवून जिल्हाध्यक्ष होत असतील तर गरीब कार्यकर्ता व पक्षाचे पुर्वी पासून काम करत अलेला कार्यकर्ता कधीच पुढे येवू शकनार नाही. जिल्हाध्यक्षनंतर उपाध्यक्ष यांना जिल्हाध्यक्ष पदाचा मान मिळायला हवा पण जास्त श्रीमंत व्यक्ती आहे म्हणून हे पद देणे योग्य नाही.
धाराशिव जिल्हातील अवधुत विश्वास क्षिरसागर (युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष)श्रीनिवास पाटील (युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष)अण्णा महाणवर (युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणिस)अमर तागडे (युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष) परंडा विधानसभा दत्तात्रय तांबे (विधानसभा अध्यक्ष)धनाजी सोनवणे (विधानसभा उपाध्यक्ष)मोईज सय्यद (विधानसभा उपाध्यक्ष)अमित पाटील (विधानसभा सरचिटणीस)तुळजापूर विधानसभा अभिजीत कदम (विधानसभा अध्यक्ष)कळंब विधानसभा – धाराशिव विधानसभा, शशिकांत निरफळ (विधानसभा अध्यक्ष)रोहित कसबे (विधानसभा उपाध्यक्ष)बबन हौसलमल (विधानसभा सचिव)विवेक गायकवाड (विधानसभा सचिव)नवज्योत शिंनगाडे (विधानसभा सचिव)उमरगा विधानसभा हरी शिंदे (विधानसभा सचिव)मिथुन राठोड (विधानसभा सचिव) व ताहेर शेख (विधानसभा सचिव) यांच्या सह्या आहेत.