Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

प्रशासन अलर्ट मोडवर – मंजुर व नामंजुर मतदार नोंदणी अर्जाची होणार पुन्हा तपासणी, जिल्हाधिकारी डॉ ओम्बासे यांचे आदेश

समय सारथी by समय सारथी
October 17, 2024
in महाराष्ट्र
0
गुन्हा नोंद – 40 आरोपी, बोगस आधार कार्ड आधारे मतदार नोंदणी अर्ज –  तुळजापूर विधानसभा मतदार संघातील प्रकार
0
SHARES
577
VIEWS

धाराशिव – समय सारथी 

तुळजापूर येथील बोगस मतदार अर्ज नोंदणीच्या घटनेनंतर निवडणुक विभाग अलर्ट मोडवर आला असुन लोकसभा निवडणुकीनंतर ज्या नावांची नोंदणी करण्यात आली आहे व जे अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत अश्या सर्व अर्जाची व सोबत जोडलेल्या कागदपत्रे यांची पुन्हा एकदा तपासणी होणार आहे. जिल्हाधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी याबाबत आदेश दिले आहेत. तुळजापूर विधानसभा मतदार संघात जे अर्ज नामंजूर करण्यात आले त्या अर्जाची तपासणी करण्यात येणार असुन त्यात बोगसगिरी सापडल्यास तसे पोलीस विभागाला कळविले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. 

लोकांनी, राजकीय पक्षाच्या प्रतिनिधी यांनी प्रसिद्ध मतदार यादी पाहावी व त्यात काही आक्षेप असल्यास नोंदवावेत. कुठे बोगस अर्ज नोंदणी किंवा मतदार नोंदणी झाल्याची माहिती, तक्रार असल्यास लेखी तक्रार जिल्हा प्रशासनाकडे करावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ ओम्बासे यांनी केले आहे.

तुळजापूर विधानसभा मतदार संघात बोगस नव मतदार अर्ज नोंदणी प्रकरणात 40 जणांवर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्या आदेशानंतर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तुळजापूर विधानसभा मतदार संघाचे सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सायबर पोलिसात गुन्हा नोंद करुन तो तुळजापूर पोलिसांकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे. 

मतदार नोंदणी करताना काही अर्जदार यांच्या अर्जासोबत जोडलेल्या आधार कार्डमध्ये नामांकन क्रम म्हणजे इनरॉलमेंट क्रमांक हा एकसारखाच आढळुन आला तसेच आधार कार्डवर डिजीटल सहीमध्ये दिनांक व वेळ एकसमान असल्याचे आढळून आले आहे. मोबाईल धारकांनी बनावट मतदार म्हणुन मतदार यादीमध्ये नांव समाविष्ट करण्यासाठी बनावट आधार कार्ड बनविले. भारत निवडणुक आयोगाचे व्होटर हेल्पलाईन नावाचे मोबाईल ॲपव्दारे लॉग ईन करून ऑनलाईन बनावट कागदपत्र सादर करून भारत निवडणुक आयोगाची फसवणुक केली अशी तक्रार तहसीलदार तथा सहायक मतदान नोंदणी अधिकारी अरविंद शंकरराव बोळंगे यांनी दिली. भारतीय न्याय संहिताचे कलम 172,3(5),318(2),335,336(2)(3),340(2),61(2),62 अन्वये सायबर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 2 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर या दरम्यान गुन्हा घडला आहे. 

बोगस आधार कार्ड, रहिवासी दाखले, मोबाईल नंबर, फोटो व इतर कागदपत्रे वापरून तुळजापूर विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात फॉर्म 6 भरून अर्जाची नोंदणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे त्या गावचे नागरिक नसुन त्यांना गावात कोणीही ओळखत नाही. फॉर्म 6 भरताना त्यांनी स्थानिक नागरिक असल्याचे काही पुरावे जोडले आहेत ते ही बोगस आहेत. अमोल शिवाजीराव जाधव यांनी निवडणुक निर्णय अधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्याकडे तक्रार केली होती.

आरोही उमेश सगाटे, नीलिमा शेखर रबाळे,शैलेश किशोर सालगे, तुषार पंकज इनागटे यासह 50 जणांच्या नावे फॉर्म 6 ( नवीन मतदार नोंदणी ) हंगरगा नळ या गावात मतदार नोंदणीसाठी अर्ज भरला आहे. अर्ज भरताना जे आधार कार्ड जोडण्यात आले ते नंबर व कार्ड अस्तित्वात नसुन त्याचा इनरॉलमेंट नंबर व वेळ एकच आहे त्याचा अर्थ हे सगळे बोगस कार्ड आहेत. त्यांचे वय व फोटो या इतर बाबी पाहता त्या कुठेही जुळत नाहीत. ज्येष्ठ नागरिक, महिला, कॉलेज विद्यार्थी यांच्या नावाने बोगस आधार कार्ड, मोबाईल नंबर, फोटो व इतर कागदपत्रे वापरून अर्ज करण्यात आले आहेत.काही विद्यार्थी यांचे फोटो हे मेडिकल ऍप्रॉन, सुट घालुन आहेत तर ज्येष्ठ नागरिक यांचे फोटो आहेत पण आधार कार्डवर त्यांचे वय 30-40 वर्षाच्या आत आहे. 

Previous Post

गुन्हा नोंद – 40 आरोपी, बोगस आधार कार्ड आधारे मतदार नोंदणी अर्ज –  तुळजापूर विधानसभा मतदार संघातील प्रकार

Next Post

चावडी वाचन – मतदार याद्याचे होणार गावात वाचन, जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे आदेश

Related Posts

महाराष्ट्र

जेलमध्ये रवानगी – लाच प्रकरण, पोलिस निरीक्षक मारुती शेळके धाराशिव कारागृहात

July 1, 2025
महाराष्ट्र

आत्महत्या प्रकरण – सुरेश कांबळे यांचा भुम कोर्टात अटकपुर्व जामीन अर्ज, 3 जुलैला निकाल – दोषारोपपत्र दाखल

July 1, 2025
महाराष्ट्र

माजी मंत्री तानाजीराव सावंत यांची प्रकृती बिघडली – आयसीयुमध्ये ऍडमिट, अँजिओप्लास्टी होणार

June 28, 2025
महाराष्ट्र

नळदुर्ग घरकुल घोटाळा – एका ठेकेदाराचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळला, अटक कधी ? 3 कोटी 94 लाखांच्या अपहाराचा ठपका 

June 28, 2025
महाराष्ट्र

टॅक्स प्रॅक्टेशनर्स असोसिएशन धाराशिवच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या बिनविरोध निवडी

June 27, 2025
महाराष्ट्र

न्यायायीन कोठडी, तात्पुरता जामीन नाकारला – पोलीस निरीक्षक मारुती शेळके यांच्या अडचणीत वाढ, निलंबन

June 28, 2025
Next Post
आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

चावडी वाचन - मतदार याद्याचे होणार गावात वाचन, जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

जेलमध्ये रवानगी – लाच प्रकरण, पोलिस निरीक्षक मारुती शेळके धाराशिव कारागृहात

July 1, 2025

आत्महत्या प्रकरण – सुरेश कांबळे यांचा भुम कोर्टात अटकपुर्व जामीन अर्ज, 3 जुलैला निकाल – दोषारोपपत्र दाखल

July 1, 2025

माजी मंत्री तानाजीराव सावंत यांची प्रकृती बिघडली – आयसीयुमध्ये ऍडमिट, अँजिओप्लास्टी होणार

June 28, 2025
July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp