धाराशिव – समय सारथी
जय पराजय होत असतो तो मी मान्य ही केलाय मात्र शिवसेनेच्या नेत्यांनी माझे नाव घेऊन गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व नेत्यांनी मला यां निवडणुकीत मदत केली व भविष्यात सुद्धा एकदिलाने आम्ही लढू आणि भाजप महायुतीचा अध्यक्ष होईल, माझ्या बद्दल दिलेली माहिती चुकीची असल्याचे माजी जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य म्हणाले.
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे सर्वसाधारण महिला प्रवर्गसाठी राखीव असुन भाजपमध्ये सर्वसाधारण जागेवर जे उमेदवार उभे होते ते पुढे स्पर्धक होतील म्हणुन त्यांना सुद्धा पाडले असा आरोप शिवसेनेचे अविनाश खापे यांनी केला होता त्याला चालुक्य यांनी उत्तर दिले.











