धाराशिव – समय सारथी
शिवसेना उबाठा गटाचे युवासेनेचे जिल्हा प्रमुख अक्षय ढोबळे, नगरसेवक राणा बनसोडे यांनी शिवसेनेला रामराम ठोकत भाजपात प्रवेश केला आहे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पुणे येथे प्रवेश घेण्यात आला आहे. धाराशिव शहरात शिवसेना उबाठा गट फोडण्यात भाजपला यश आले असुन आगामी काळात काही जण पक्ष सोडणार असल्याची माहिती आहे. शिवसेना पक्षात शिंदे व ठाकरे हे 2 गट पडले त्यानंतर शिंदे गट सत्तेत गेला मात्र धाराशिव शहरात अनेक जण ठाकरे गटात राहिले मात्र आता पडझड व्हायला सुरुवात झाली आहे. नगराध्यक्षपदाचा ओबीसी उमेदवार हा कळीचा मुद्दा ठरल्यानंतर शिवसेना पक्ष फुटीला सुरुवात झाली आहे. भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेश अध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे, उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रवेश केला.
शिवसेना उबाठा गटाचे अक्षय ढोबळे यांनी गटबाजीचा आरोप करीत पदाचा राजीनामा दिला आहे. स्थानिक गटबाजीमुळे मी माझ्या युवा सेना विभागीय सचिव तथा युवासेना जिल्हाप्रमुख (धाराशिव) या दोन्ही पदाचा राजीनामा दिला आहे. दोन्ही पदाचा मान राखून मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडत आहे. आपण सर्वांनी दिलेला मान व सन्मान व साथ यासाठी धन्यवाद असे त्यांनी राजीनामा पत्रात म्हणटले आहे.