धाराशिव – समय सारथी
प्रसिध्द अभिनेते तथा होममिनिस्टर फेम महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांधेकर प्रस्तुत “खेळ मांडियेला” सन्मान महिलांचा : जिजाऊ, सावित्री, रमाईच्या लेकींचा हा मनोरंजनात्मक कार्यक्रम शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने शनिवारी आयोजीत केला होता. जिल्हा परिषद मल्टीपर्पज शाळेच्या मैदानावर झालेला कार्यक्रम महिलांनी अभुतपुर्व प्रतिसाद देत यशस्वी केला. यावेळी पहिल्या तीन विजेत्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते पैठणी देऊन सन्मान केला.
दैनंदिन व्यस्ततेतून माता-भगिनींना स्वतःसाठी वेळ मिळावा, मनोरंजना बरोबर त्यांच्यातील सुप्त कलागुणांना, कौशल्याला वाव मिळावा यासाठी महाराष्ट्राचे भावोजी आदेश बांदेकर यांचा ‘खेळ मांडियेला’ कार्यक्रमास धाराशिवच्या महिलांनी रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली होती.
या कार्यक्रमाला खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर सपत्नीक हजर होते. याशिवाय पंचायत समितीचे माजी उपसभापती शाम जाधव, शहराध्यक्ष सोमनाथ गुरव, युवा सेनेचे विभागीय सचिव अक्षय ढोबळे, युवती जिल्हाप्रमुख मनिषा वाघमारे,पंकज पाटील, बाळासाहेब काकडे,रवी वाघमारे,दिनेश बंडगर,केदार साळुंखे आदीसह मान्यवर उपस्थित होते.
तब्बल चार तास महिलांना खिळवुन ठेवत आदेश बांदेकर यांनी विविध खेळ, मस्ती, मजा करत उपस्थितांचे मनोरंजन केले. खेळात सहभागी महिलांनी स्पर्धेत सहभागी होऊन बक्षिसे जिंकली आणि मानाच्या पैठणीही पटकावल्या.जेष्ठांपासून ते लहानांपर्यंत महिला-भगिनींच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडुन वाहत होता.कधीही घराबाहेर न पडणाऱ्या या महिला कार्यक्रमामुळे घराबाहेर पडल्या, मनसोक्त स्पर्धा खेळल्या, नाचल्या, हसल्या बागडत आनंद द्विगुणीत केल्याचे दिसुन आले.
विजेत्याची नावे- पहिला क्रमांक संजीवनी कृष्णा तांबे, दुसरा रत्नमाला अंबादास पवळे, तिसरा क्रमांक निर्मला दिलीप मोहिते.