धाराशिव – समय सारथी
गुन्ह्यात अटक न करण्यासाठी व गुन्ह्यातून नाव कमी करण्यासाठी 1 लाख रुपये लाचेची मागणी करुन 50 हजाराची लाच घेताना सहायक पोलिस निरीक्षकाला धाराशिव लाचलुचपत विभागाने कारवाई करीत अटक केली आहे. तामलवाडी पोलिस ठाण्याचे प्रभारी सुरज शांतीलाल देवकर यांना 50 हजार लाच घेताना रंगेहात अटक केली.
देवकर हे पोलीस स्टेशन तामलवाडी येथे प्रभारी अधिकारी आहेत.तक्रारदार यांच्यावर पोलीस स्टेशन तामलवाडी येथे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा तपास प्रभारी अधिकारी यांच्या अधिपत्याखालील पोलिस अंमलदार यांच्याकडे आहे. सदर तपास अधिकारी यांना सांगून नमूद तक्रारदार यांना सदर गुन्ह्यामध्ये अटक न करण्यासाठी व गुन्ह्यातून नाव कमी करण्यासाठी यातील आलोसे यांनी लाचमागणी पडताळणी दरम्यान पंचासमक्ष 1 लाख रुपये लाचेची मागणी करून पहिला हप्ता 50 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य करून सदरची लाच रक्कम पंचासमक्ष स्वतः स्विकारली. देवकर यांना ताब्यात घेण्यात आले असून पोलीस ठाणे तामलवाडी येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे. सापळा अधिकारी म्हणुन पोलिस निरीक्षक नानासाहेब कदम, सापळा पर्यवेक्षण अधिकारी पोलिस उपअधीक्षक सिद्धाराम म्हेत्रे यांनी काम पाहिले. मार्गदर्शक अधिकारी पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलिस अधीक्षक मुकुंद आघाव यांनी केले. सापळा पथकात पोलीस अंमलदार सिध्देश्वर तावसकर, आशीष पाटील, विशाल डोके, शशिकांत हजारे यांचा समावेश होता.