धाराशिव – समय सारथी
धाराशिव पंचायत समितीमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे.
पंचायत समितीचे सहायक लेखाधिकारी मिलींद कांबळे व एका खासगी दलालाला लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. धाराशिव पंचायत समितीमधील वरिष्ठ सहाय्यक लेखा अधिकारी मिलिंद सूर्यकांत कांबळे व खासगी इसम सेवानिवृत्त सेवानिवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक हनुमंत गोपाळ पवार (काकडे प्लॉट धाराशिव) यांनी 4 हजार रुपयांची मागणी करुन 4 हजार लाच घेताना रांगेहात अटक केली.
तक्रारदार यांची आई ह्या ज़िल्हा परिषद शाळेतून शिपाई या पदावरून सेवानिवृत्त झालेल्या असून त्यांना शासनाकडून मिळणाऱ्या अंशराशीकरण व उपदानाची 15 लाख 29 हजार 804 रुपये रक्कम तक्रारदार यांच्या आईच्या खात्यावर जमा करून देण्यासाठी यातील आरोपीनी लाच घेतली. दोन्ही आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले असुन पोलीस ठाणे आनंदनगर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
पोलीस अधीक्षक, संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक, विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक सिध्दाराम म्हेत्रे यांच्या पथकाने ही कारवाई केली. सापळा पथकात पोलीस अंमलदार दिनकर उगलमुगले, विष्णू बेळे, सचिन शेवाळे,सिद्धेशर तावस्कर,अविनाश आचार्य,नागेश शेरकर यांनी काम पाहिले.
लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर कार्यालय 02472 222879 व टोल फ्री क्रमांक 1064 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे