धाराशिव – समय सारथी
कृषी सेवा केंद्र दुकानातील औषधांचे सॅम्पल न घेण्यासाठी व वर्षभराच्या सीजनमध्ये कारवाई न करता सहकार्य करण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच घेताना एका विस्तार अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.धाराशिव येथील लाचलुचपत विभागाने ही मोठी कारवाई केली आहे.
आरोपी हा बीड जिल्ह्यातील पाटोदा पंचायत समिती येथील विस्तार अधिकारी असून त्यांचे नाव मुकुंद भुतपल्ले असे आहे. आरोपीने 6 सप्टेंबर रोजी 10 हजार लाचेची मागणी केली त्यानंतर 4 ऑक्टोबर म्हणजे जवळपास एक महिन्याने लाच स्वीकारली.
सापळा अधिकारी म्हणून धाराशिव येथील लाचलुचपत विभागाचे पोलिस निरीक्षक नानासाहेब कदम यांनी पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, पोलिस उपाधीक्षक सिद्धराम म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली.
सापळा पथकात पोलीस अंमलदार विशाल डोके,विष्णू बेळे,सिद्धेशर तावस्कर,अविनाश आचार्य, दत्तात्रेय करडे यांनी कारवाई केली.