गंडा घालणाऱ्या 4 जणांच्या टोळीला 2 दिवसाची पोलीस कोठडी
उस्मानाबाद – समय सारथी
लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधू विवाहातील दागिन्यांसह पसार झाल्याची घटना घडल्यानंतर नांदेडच्या वधूसह चौघांना उस्मानाबाद पोलिसांनी अटक केली आहे.त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.या 4 जणांच्या टोळीने आणखी कोनाकोणाची फसवणूक केली आहे याचा तपास पोलीस करीत आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यातील अंबी येथील विश्वनाथ भोसले या तरुणाचा विवाह नांदेड येथील एका तरुणी सोबत 18 सप्टेंबरला झाला होता. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी लघुशंकेच्या बहान्याने नववधू विवाहातील दागिन्यांसह तीच्या इतर सहकाऱ्यांच्या मदतीने पसार झाली होती त्यांना उस्मानाबाद पोलीसानी नांदेड येथून अटक केली आहे. आरोपी विरोधात अंबी पोलीस ठाण्यात कलम 406, 420, 34 अंतर्गत नोंदवण्यात आला.अंबी पोलीस ठाण्याचे सपोनि आशिष खांडेकर, पोहेकॉ पाटील, पोना लक्ष्मन माने, सिध्देशवर शिंदे, पोकॉ सतीश राऊत, रामकिसन कुंभार, प्रभु कातुरे, साबिया शेख,नितीन गुंडाळे यांच्या पथकाने गतीमान तपास केला. यातून बनावट वधू पुजा ओढणे, आप्पा भांगे, शुभम दवणे, नारायण सोनटक्के अशा चौघांना विवाहातील दागिन्यांसह नांदेड येथून अटक केले आहे.