धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी गुन्ह्यातील आरोपी विनोद गंगणे यांचा जामीन अर्ज धाराशिव येथील कोर्टाने फेटाळला असुन कोर्टाने जामीन देण्यास नकार दिला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश टी जी मिटकरी यांनी जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख यांचा युक्तिवाद ऐकून जामीन फेटाळला. गंगणे यांचा जेलमधील मुक्काम वाढला आहे. गुन्ह्यांचे स्वरूप, उपलब्ध पुरावे व गंगणे यांचा या गुन्ह्यातील सहभाग याबाबत ऍड देशमुख यांनी बाजु मांडली तो युक्तिवाद ऐकून जामीन फेटाळला.
विनोद गंगणे हे पोलिसांचे खबरी असुन त्यांनी ड्रग्ज तस्करी गुन्ह्याची टीप पोलिसांना दिली, ते व्यसनमुक्त झाले असुन त्यांचा सहभाग केवळ सेवनापुरता मर्यादित असल्याचे गंगणे यांचे वकिलांनी कोर्टात सांगितले. गंगणे यांनी जे 12 लाखांचे ड्रग्ज खरेदी केले ते स्वतःसाठी होते त्यांनी विक्री केली नाही असे ते म्हणाले. वैद्यकीय कारण असल्याने जामीन अर्ज निकाली काढत जामीन द्यावा अशी मागणी गंगणे यांच्या वकिलांनी केली.
गंगणे यांनी ड्रग्ज सेवनाला प्रोत्साहन दिले, गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचून ड्रग्ज खरेदी केली व त्याची साठवणूक केली त्याचा सहभाग हा मोठा असुन त्यामुळे तुळजापूर येथील अनेक तरुणांना व्यसन लागले असा युक्तिवाद ऍड देशमुख यांनी केला. गंगणे यांचे इतर आरोपी सोबत असलेले आर्थिक व्यवहार, संभाषण व इतर पुरावे मिळाले असुन सहभागी वाढला आहे असे सांगत ऍड देशमुख यांनी कलमवाचून दाखवले.