धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात पोलिसांनी कोर्टात दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. हे प्रकरण केवळ ड्रग्ज तस्करी पुरते मर्यादित न राहता तपासात अनेक बाबी समोर आल्या आहेत. ड्रग्ज तस्करीतील काही आरोपी गांजा तस्करी, अवैध शस्त्र, मटका, चक्री यासह इतर अवैध धंद्यात आडकले असुन त्यांबाबतचे संभाषण व इतर पुरावे पोलिसांना सापडले आहेत. काही बाबी उघड झाल्या असल्या तरी पोलिसांनी त्याकडे कानाडोळा केला असल्याचे दिसत आहे.
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात पोलिसांनी 15 फेब्रुवारी रोजी गुन्हा नोंद करुन रोजी तब्बल 10 हजार 744 पानाचे चार्जशीट कोर्टात दाखल केले त्यात पोलिसांनी 36 जणांना आरोपी केले. या गुन्ह्यांचे दोषारोप पत्र दाखल करताना पोलिसांनी आरोपींचे बँक स्टेटमेंट, त्यांचे संभाषण, आरोपी व साक्षीदार यांचे जबाब नोंद केले आहेत. त्यानुसार ड्रग्ज तस्करीतील काही आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन त्यांच्यावर अनेक गुन्हे नोंद आहेत. गांजा, गुटखा तस्करीसह अवैध शस्त्र, मटका, जुगार यासह अन्य अवैध धंद्याबाबतचे संभाषण मिळाले आहे.
आरोपी संदीप राठोड हा गांजा तस्करीत करीत असल्याचे संभाषण पोलिसांना मिळाले असुन चॉकलेट हा कोडवर्ड वापरत होता. मुंबई येथील. तस्कर संगीता गोळे व वैभव गोळे हे चरस विक्री करीत होते.संकेत शिंदेसह अन्य जन मटका, चक्री यात अडकले असुन काही व्यवहार त्यातून झाल्याचे कबुल केले आहे. गांजाचे फोटो व इतर पुरावे दोषारोप पत्रात असुन त्याचे कनेक्शन थेट ओडिसापर्यंत दिसते. काही साक्षीदार यांनी आरोपीसोबत झालेले आर्थिक व्यवहार हे सावकारकी, चक्री, मटक्याचे असल्याचे मान्य केले आहे. पोलिसांनी ड्रग्ज तस्करी गुन्हा सोबत गांजा,चरस,अवैध शस्त्र याचा तपास करुन गुन्हा नोंद करणे गरजचे आहे. ड्रग्जबरोबर यांचे गांजा तस्करीचे मोठे सिंडीकेट कार्यरत आहे.