धक्कादायक – कुटुंब नियोजन शस्त्रक्रीयानंतर महिलेचा मृत्यू , संतप्त नातेवाईकांची कारवाईसाठी रुग्णालयात तोडफोड
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद शहरातील गरड हॉस्पिटलमध्ये एका महिलेचा कुटुंब नियोजन शस्त्रक्रीयानंतर मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डॉक्टर व हॉस्पिटल प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू झाला असल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईक यांनी केला असुन संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात तोडफोड केली. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
सांजा चौक या भागातील शिल्पा डोंगे या महिलला एक मुलगा व एक मुलगी होती त्यामुळे त्यांनी कुटुंब नियोजन करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉ अनुराधा गरड यांच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. शस्त्रक्रिया झाल्यानंतर महिलेचा धक्कादायक रित्या मृत्यू झाला त्यामुळे दोषींवर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी नातेवाईक यांनी केली आहे. गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतल्याने तणावाचे वातावरण आहे.