वाशी – समय सारथी
शेत जमिन मोजणीच्या हद्द कायम खुणा करण्यासाठी 3 हजार रुपयांची लाचेची मागणी करुन तडजोडी अंती 2 हजार रुपयांची लाच रक्कम स्वीकारताना वाशी उप अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील लिपीक दिगंबर मारुती ढोले याला धाराशिव येथील लाचलुचपत विभागाने अटक केली आहे.
तक्रारदार यांचे आईचे नावे असलेल्या शेत जमीन गट न. 444 मधील मोजणी केलेल्या शेत जमिनीची हद्द कायम मोजणी करणे बाबत उप अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालय, वाशी जिल्हा धाराशिव यांचे कार्यालयात अर्ज दिला होता. त्यावरून तक्रारदार यांचे शेत जमिनीची मोजणी 7 मे 2025 रोजी भूमी अभिलेख कार्यालयातील लोकसेवक ढोले यांनी केली. त्यानंतर हद्द कायमच्या खुणा करण्यासाठी लोकसेवक ढोले हे तक्रारदार यांचेकडे 3 हजार रुपये लाच मागणी करत असलेबाबत तक्रारदार यांनी समक्ष ला प्र वि धाराशिव येथे येवुन तक्रार दिली होती.
उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय वाशी येथे पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता लोकसेवक ढोले यांनी तक्रारदार यांचे शेत जमिन मोजणीच्या हद्द कायम खुणा करण्यासाठी लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. आरोपी याचेविरुध्द कलम 7, भ्र.प्र.अधिनियम 1988 अन्वये पोलीस ठाणे वाशी धाराशीव येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
सापळा अधिकारी म्हणुन विकास राठोड, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. धाराशिव सापळा पर्यवेक्षण अधिकारी सिध्दाराम म्हेत्रे, पोलीस उप-अधीक्षक, ला.प्र.वि. धाराशिव यांनी काम पाहिले. सापळा पथकात पोलीस अंमलदार आशिष पाटील, विशाल डोके, जाकेर काझी. चालक पो ना दत्तात्रय करडे यांचा समावेश होता.