धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज प्रकरणातील आरोपी माजी सभापती शरद जमदाडे व आबासाहेब पवार या 2 आरोपीची वाढीव पोलिस कोठडी आज 27 मे रोजी संपणार असुन त्यांना कोर्टात हजर केले जाणार आहे तर 3 आरोपींच्या अटकपुर्व जामीन अर्जासह 18 अटक आरोपींची नियमित सुनावणी होणार आहे. 8 आरोपीनी अटकपूर्व जामिनीसाठी अर्ज केला असुन त्यातील कदम, शेख व अमृतराव या 3 जणांच्या अर्जावर आज सुनावणी होणार आहे. जमदाडे व पवार यांच्या 2 वेळेस 11 दिवस मिळालेल्या पोलिस कोठडीत पोलिसांना महत्वाचे पुरावे, धागेदोरे मिळाले असल्याची सूत्रांची माहिती आहे.
माजी सभापती शरद जमदाडे व माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापु कणे यांचा भाचा आबासाहेब पवार याला अटक केल्यानंतर कोर्टात दिलासा मिळेल अशी अपेक्षा सेवन गटाला होती मात्र कोर्टाने 2 वेळेस पोलिस कोठडी दिली आहे. जिल्हा न्यायाधीश टी जी मिटकरी यांच्या कोर्टात सुनावणी होणार आहे. नानासाहेब खुराडे या आरोपीला 2 जुनपर्यंत 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. जिल्हा सरकारी वकील ऍड सचिन सुर्यवंशी व तपास अधिकारी सपोनि गोकुळ ठाकुर यांनी कोर्टात जोरदार युक्तिवाद केला होता.
धाराशिव येथील कोर्टाने 9 जणांचा जामीन नाकारला असुन 8 जणांचे अटकपुर्व जामीन अर्ज सुनावणी स्तरावर प्रलंबित आहेत, त्यात 4 आरोपी सेवन तर 4 आरोपी तस्कर गटातील आहेत. सेवन गटातील फरार आरोपी विशाल सोंजी (28 मे) अभिजीत अमृतराव (27 मे), अलोक काकासाहेब शिंदे (29 मे) व जगदीश जीवन पाटील यांच्या अर्जावर 28 मे ला सुनावणी होणार आहे तर तस्कर गटातील फरार आरोपी संतोष कदम परमेश्वर (27 मे) व उदय उल्हास शेटे यांच्या अर्जावर 28 मे रोजी तर तस्कर गटातील जेलमधील अटक आरोपी राहुल कदम परमेश्वर (28 मे) व सुलतान उर्फ टिपू शेख याच्या अर्जावर 27 मे रोजी सुनावणी होणार आहे. 18 आरोपी जेलमध्ये असुन त्यांची नियमित सुनावणी 27 मे रोजी होणार आहे.
तुळजापूर ड्रग्ज तस्करीत 36 आरोपी असुन 18 जणांना अटक केली असुन 18 जन फरार आहेत. 36 पैकी 16 तस्कर व 2 सेवन गटातील आरोपी अटकेत आहेत. तस्कर गटातील 26 पैकी 10 आरोपी फरार आहेत तर सेवन गटातील 10 पैकी 8 आरोपी फरार आहेत. पोलिस अधीक्षक रितु खोकर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना मॅडम, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख, जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकुर हे तपास करीत आहेत.