टोळी गजाआड – 4 पिस्टल, 3 काडतुसासह 5 आरोपी अटकेत
तुळजापूर – समय सारथी
तुळजापूर पोलिसांनी शस्त्र बाळगणारी टोळीचा उलगडा केला असून 4 पिस्टल व 3 जिवंत काडतुसांसह 5 आरोपी अटक केले आहेत.
उस्मानाबाद – लातूर रस्त्यावरील पाचुंदा तलावाजवळ दोन पुरुष गावठी बनावटीचे पिस्टल बाळगून असल्याची गोपनीय खबर तुळजापूर पोलीस ठाण्याच्या पथकास 30 डिसेंबर रोजी मिळाली होती. यावर पथकाने लागलीच पाचुंदा तलाव परिसर गाठून तुळजापूर तालुक्यातील खंडाळा येथील राजेंद्र सुरेश कांबळे यांसह एका अल्पवयीन मुलास पिस्टलसह ताब्यात घेतले होते. या प्रकरणात तुळजापूर पोलीस ठाण्यात शस्त्र कायदा कलम 36, 25 सह 188, 34 व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37, 135 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.तपासादरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे पाटील व पोलीस निरीक्षक अजिनाथ काशीद यांच्या मार्गदर्शनाखालील सपोनि सुशील चव्हाण, ज्ञानेश्वर कांबळे, पोउपनि राहुल रोटे, चनशेट्टी, पोहेकॉ अजय सोनवणे, अतुल यादव, पोना गणेश माळी, लक्ष्मी चव्हाण, अमोल भोपळे, गणेश पतंगे, अजित सोनवणे, बाळासाहेब देवबोणे यांच्या पथकाने केला.
तुळजापूर येथील सचिन खंडु जाधव, वय 29 यांसह, शैलेश श्रीकांत नरवडे, वय 23 वर्षे, विश्वजीत विजय आमृतराव, वय 25 यांसह, सौरभ दत्तात्रय टोले, वय 22 वर्षे यांसह उस्मानाबाद येथील मयुर बापु बनसोडे, वय 26 वर्षे यांना 13 जानेवारी रोजी ताब्यात घेउन त्यांच्या ताब्यातून गावठी बनावटीचे 4 पिस्टल सह 3 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
तुळजापूर पोलीसांनी केलेल्या या यशस्वी कामगीरीचे पोलीस अधीक्षक नीवा जैन व अपर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे.