चिंताजनक – कोरोनाचे जिल्ह्यात 334 रुग्ण तर 112 कोरोनामुक्त
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने बुधवारी कहर केला असून तब्बल 334 रुग्ण सापडले असून 112 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसेंदिवस कोरोना स्तिथी गंभीर बनत चालली आहे. नमुने तपासणीत रुग्ण पॉझिटीव्ह येण्याचे प्रमाण 15.42 टक्के राहिले. बुधवारी 2 हजार 165 रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यापैकी 334 म्हणजे 15.42 टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आले त्यात रॅपिड चाचणीत 163 तर आरटीपीसीआर चाचणीत 171 जण पॉझिटिव्ह आले.
उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यात सर्वाधिक 110 रुग्न सापडले. जिल्ह्यात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या 1 हजार 161 झाली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात बुधवारी 334 रुग्ण सापडले त्यात तुळजापूर 27, उमरगा 60, लोहारा 42, कळंब 30, वाशी 28, परांडा 25 व भूम तालुक्यात 12 रुग्ण सापडले. उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर कोरोनाचे 69 हजार 661 रुग्ण सापडले त्यापैकी 66 हजार 661 रुग्ण उपचार नंतर बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 95.64 टक्के आहे. जिल्ह्यात आजवर 1 हजार 510 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून मृत्यू दर हा 2.17 टक्के आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाच्या उपाययोजना करण्यात आल्या असून आरोग्य प्रशासन दक्ष व सज्ज झाले आहे. महसूल व पोलीस यंत्रणाही कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी काळजी व प्रतिबंधात्मक कारवाई करीत आहे.