वाक युद्ध – जिल्हा बँकेची स्तिथी तेरणा कारखान्यासारखी होऊ नये
आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचा खासदार ओमराजे यांच्यावर निशाणा
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक काही अपप्रवृत्तीच्या हातात कारभार जाऊ नये, बँकेची सुधारत असलेली परिस्थिती पुन्हा तेरणा कारखान्या सारखी होऊ नये, यासाठी निवडणूक लढविली असे म्हणत भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला आहे. पक्ष काय असतो याची ताकत राष्ट्रवादी सोडून भाजपात गेलेल्या राणाजगजीतसिंह पाटील यांना आज कळाली असेल अशी टीका शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली होती त्याला आमदार राणा यांनी प्रतिउत्तर दिले आहे. जिल्हा बँकेच्या निकालानंतर सोशल मीडियावर ओमराजे यांच्यावर भाजप कार्यकर्ते तेरणेचा भंगार चोर अशी टिका करीत आहेत त्यातच आमदार राणा यांनी जिल्हा बँक व तेरणा कारखाना याची तुलना केल्याने वादात भर पडली आहे. आगामी काळात वाकयुद्ध चांगलेच रंगणार आहे.
सत्तेतील तिन्ही पक्षांना एकत्रित येऊन भाजपा विरोधात लढावं लागलं, यातच सर्व काही आलं. दोन माजी मंत्री,एक खासदार, तीन आमदार,दोन माजी आमदार हे सर्व सत्ताधारी पक्षातील एकत्रित येऊन लढले. काही अपप्रवृत्तीच्या हातात कारभार जाऊ नये, बँकेची सुधारत असलेली परिस्थिती पुन्हा तेरणा कारखान्या सारखी होऊ नये, यासाठी निवडणूक लढविली.लोकशाहीमध्ये मतदार सर्वोच्च आहे. त्यांनी दिलेला कौल आम्ही मान्य करतो. पराभवाची कारणमीमांसा व निकालाचे आत्मचिंतन करू असे आमदार पाटील म्हणाले.
राज्यात सत्तेत असतानाही मागील दोन वर्षांपासून थकहमीचे पैसे यांना आणता आले नाहीत. बँकेला एक रुपयाचीही मदत सरकारकडून आणू शकले नाहीत. निदान आता तरी थक हमीचे पैसे आणतील अशी आशा करतो.नवनिर्वाचित संचालक मंडळाचे अभिनंदन. बँक पूर्वपदावर आणण्यासाठी आमच्या संचालक मंडळाने सुरू केलेले प्रयत्न ते सुरू ठेवतील, या अपेक्षेसह शुभेच्छा, सर्व मतदारांचे आभार आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मानले आहेत.
पक्ष काय असतो याची ताकत राष्ट्रवादी सोडून भाजपात गेलेल्या राणाजगजीतसिंह पाटील यांना आज कळाली असेल अशी टीका शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली होती त्याला आमदार राणा यांनी प्रतिउत्तर दिले आहे. एखाद्या पराभवामुळे ४० वर्ष ज्या पक्षाने सत्ता दिली त्याला सोडून राणा पाटील हे भाजपात गेले. ग्रामपंचायतलाही निवडून न येता त्यांना शरद पवार यांनी थेट राज्यमंत्री केले, त्या पक्षाला सोडणाऱ्या नेत्यांना जिल्हा बँक निवडणुक धडा घेण्यासारखी आहे .पक्ष संघटना व कार्यकर्ते काय असतात हे त्यांना समजल असेल अशी टिका खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली आहे.