चिवरी येथे 2 गटात तुंबळ हाणामारी – 15 पेक्षा जास्त जखमी
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे पारधी समाजाच्या 2 गटात तुंबळ हाणामारी झाली आहे.हाणामारीत जवळपास 15 जन जखमी त्यातील 2 जन गांभीर जखमी असून त्यांना सोलापूरला उपचारासाठी पाठविले आहे.
तलवार , कोयता सह अन्य हत्यारांनी एकमेकांवर वार करण्यात आले आहेत.चिवरी येथील लक्ष्मी देवीच्या यात्रेतील प्रकार घडला आहे. उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार आहेत आहेत. अज्ञात कारणाने 2 गटात मारामारी सुरु असून पोलीस तपास आहे.तु
ळजापुर तालुक्यातील चिवरी येथील यात्रेत दोन पारधी गटात तुफान राडा झाला असुन या भांडणामुळे चिवरी यात्रेस गालबोट लागल आहे. या भांडणात तलवार काटया दगड या वापर मोठया प्रमाणात झाला असुन 5 ते 6 व्यक्ती गंभीर जखमी झाले आहे. जखमीना उपचारासाठी उस्मानाबाद येथील जिल्हा रुगालयात दाखल केले आहे.
चिवरी येथील लक्ष्मी मंदिरात परंपरेने आज यात्रा भरली होती या यात्रेत पारधी समाज मोठया प्रमाणात दर्शनासाठी येत असतो सायंकाळी पारधी समाजातील दोन गटात जुन्या वैमनस्यातून भांडण लागले या भांडणाचे रुपांतर हाणामारीत झाले दोन्ही गटानी एकमेकांना तलवारी दगड काटया याने मारहाण केली अचानक झालेल्या भांडणामुळे यात्रेत आलेल्या भाविक सैरभैर पळत सुटले. ही माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी डाँ सई भोरे पाटील यांची टिम तसेच नळदुर्ग येथील पोलीस तात्काळ चिवरी दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला आहे.पोलीस प्रशासन यातील आरोपीचा शोध घेत आहेत