धाराशिव – समय सारथी
धाराशिव शहरातील नामांकित असलेल्या पोदार इंटरनॅशनल स्कुलमध्ये शिक्षणाचा बट्याबोळ उडाला असुन अनेक प्रकाराबाबत पालकांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांना निवेदन दिले होते त्यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पालकांच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी 3 सदस्यांची चौकशी समिती गठीत केली असुन तात्काळ चौकशी अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. पोदार प्रशासनाने कारवाई न केल्याने 11 डिसेंबर रोजी बुधवारी पालक सकाळी 10.30 वाजता आंदोलन करणार आहेत.
पोदार स्कुलमधील सहशिक्षिकेवर बलात्काराच्या आरोपाखाली गुन्हा नोंद होऊन अटक असलेला शिक्षक हैदर अली शेख हा मुलींशी गैरवर्तन करायचा असा गंभीर आरोप पालकांनी निवेदनात केला आहे. मुलींना हीन भाषेत बोलणे, त्यांना टोपण नावे देणे, नकोसा स्पर्श असे प्रकार होत असल्याचा आरोप केला आहे. पोदार स्कुलमध्ये अभ्यासाबाबत अनेक त्रुटी असुन एक क्रीडा शिक्षक मुलीशी असभ्य वागणे, नकोसा स्पर्श करणे असे प्रकार करीत असल्याचा आरोप पालकांनी निवेदनात केला आहे.
पोदार स्कुलमधील सिनिअर कोओर्डीनेटर असलेला शिक्षक हैदर अली शेख याने सहशिक्षिकेला विविध आमिष दाखवून सोलापूर व धाराशिव येथे लॉजवर नेहून बलात्कार केल्याप्रकरणी पिडीत शिक्षिकेने दिलेल्या तक्रारी वरून आनंदनगर पोलिसात गुन्हा नोंद केला आहे, हा शिक्षक पिडीत शिक्षिकेस तु चांगले शिकवतेस. माझ्या ओळखी आहेत, तुझे प्रमोशन करुन एअर लीडर करतो असे सांगत आमिष दाखवायचा व तिच्यावर बळजबरीने बलात्कार करायचा असे फिर्यादीत नमुद आहे.अली याला पोलिसांनी अटक केली असुन तो धाराशिव येथील जेलमध्ये आहे तर हैदर अली शेख याला बलात्काराच्या गुन्ह्यात मदत केल्याप्रकरणी पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी धाराशिव येथील पिंक पथकाचे पोलिस उपनिरीक्षक गणेश जांभळे यांना शासकीय सेवेतून निलंबित केले आहे.
पालकांनी 25 मार्च 23 रोजी पोदार स्कुलच्या प्रशासनाकडे लेखी तक्रार दिली होती त्यात अनेक बाबी नमुद आहेत, त्यावर कारवाई न झाल्याने पुन्हा एकदा 7 डिसेंबर रोजी लेखी तक्रार दिली आहे. अभ्यासक्रम शिकवीला न जाणे, तक्रार करणाऱ्या विद्यार्थी यांना टार्गेट करणे, शाळेतील काही शिक्षक खासगी क्लासेस घेत असणे, मुलींचा ड्रेस कोड, प्रशिक्षित शिक्षक नसणे, अपुरा स्टाफ यासह अन्य बाबी तक्रारीत नमुद के