धाराशिव – समय सारथी
राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या कार्याचा आढावा घेणारे गीत प्रसारित करण्यात आले असुन ऑडियो व्हिडिओ स्वरूपातील य गीतात त्यांनी केलेली विकास कामे, आरोग्य शिबीर, शिवजलक्रांती यासह अन्य कामांची माहिती देण्यात आली आहे, हे गाणे त्यांचे प्रचारगीत बनले असुन त्याला चांगली पसंती मिळतसोशल मीडियावर चांगलेच व्हारल होत आहे. गीतकार ह्या पुणे येथील प्रीती देवगडे आहेत.
कर्तव्यपथावर राष्ट्रहिताच्या
चालले जेव्हा तानाजी
समर्पिले जीवन अपुले
जनतेचा सेवेसाठी .
विकास रत्न लाभला भूमीला
महाराष्ट्राच्या मातीला
गरजूंना हात मदतीचा
नीतीपूर्वकशासक अमुचा
हा तानाजी रयतेचा
तानाजी महाराष्ट्राचा…
आशिषाने आईच्या
घेतला वसा मातृत्वाचा
आधार तुम्ही निराधारांचा
अन्नदाता दिन दुबळ्यांचा
न भेद जातीपातीचा
करी विचार कष्टी जनांचा
तुम्ही मायबाप हो अमुचा
पाठीशी हात हींमतीचा
हा तानाजी रयतेचा
तानाजी महाराष्ट्राचा….
देऊनी धडे शिवरायांचे
ध्येय दिले तरुणाईला
लोटवूनी सागर ज्ञानाचा
मार्ग दिला प्रगतीचा
समृद्ध कराया जीवन हे
निर्धार उन्नतीचा
तेजस्वी सूर्य ज्ञानाचा
विश्वास या मनाचा
शिवजलक्रांती घडवूनी
कृषी क्रांती ही केली
सशक्तिकरण महिलांचे
करूनी रोजगारं पूरविली.
निश्चय निरोगी समाजाचा
ध्यास हा राष्ट्रहिताचा
संघर्ष हा तानाजींचा
ठेवा माणुसकीचा…
हा तानाजी रयतेचा
तानाजी महाराष्ट्राचा..