बीड – समय सारथी
विधान परिषदेचे माजी आमदार सुरेश अण्णा धस यांना भाजपने आष्टी मतदार संघातून विधानसभेची उमेदवारी दिली आहे. उमेदवारी मिळताच त्यांच्या समर्थक यांनी जल्लोष साजरा करीत विजयाचा संकल्प केला. विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांचे तिकीट कापून सुरेश धस यांना उमेदवारी देण्यात आली आहे. धस यांनी कोरोना काळात कोरोना योद्धा म्हणून जे काम सर्वसामान्यांसाठी केले ते अतुलनीय आहे. धाराशिव बीड लातुर या मतदारसंघात त्यांनी विधान परिषद सदस्य असताना अनेक भरीव कामे केली आहेत. धाराशिव येथे जिजाऊ चौक आउट पोस्ट पोलिस चौकी मंजुर करून त्यांनी शाळा महाविद्यालयातील विद्यार्थिनींना दिलासा मिळवून दिला तसेच धाराशिव शहरात सी सी टीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे यासाठी सुद्धा विधानपरिषदेमध्ये आवाज उठवला होता याची पावती उद्याच्या विधानसभेमध्ये मतांच्या रुपी मिळेल. धाराशिव नगर परिषदेत विविध घोटाळ्यांचा पर्दाफाश त्यांनी केला.