चाँकलेटच्या बहाण्याने अंगणवाडीतील बालिकेवर केला अत्याचार
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील एका खेडेगावातील अंगणवाडीत शिकणाऱ्या ४ वर्षीय मुलीला चाँकलेटच्या बहाण्याने निर्मनुष्य पडक्या वाडयात नेवुन १८ वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे हि घटना समजताच सर्वत्र संताप व्यक्त होत आहे या प्रकरणी लोहारा पोलीस स्टेशनला रात्री उशिरा गुन्हा नोंद झाला.
अधिक माहिती अशी की सोमवारी लोहारा तालुक्यातील एका खेडेगावातील अंगणवाडीत शिकत असणाऱ्या ४ वर्षीय मुलीला वर्गातुन चाँकलेटच्या बहाण्याने १८ वर्षीय तरुणाने अंगणवाडीच्या बाहेर आणले व चाँकलेट देवुन निर्मनुष्य असणाऱ्या पडक्या वाडयात नेवुन ४ वर्षीय बालिकेवर या तरुणाने अत्याचार केला. सदरील घडलेला प्रकार पिडित मुलीने घरी आल्यानंतर आईला सांगितला व निर्मनुष्य पडका वाडा दाखवला. सदरील अत्याचाराची घटना समजताच पोलीस उपविभागीय अधिकारी रमेश बरकते, सहाय्यक पोलीस निरिक्षक सुरेश नरवडे, पोलीस उपनिरिक्षक आनंदराव वाठोरे, उपनिरिक्षक अनुसया माने यांनी घडलेल्या घटना स्थळाला भेट देवुन घटनास्थळाची पाहणी केली.
पिडित मुलीच्या आईच्या फिर्यादी वरुन १८ वर्षीय तरुणाच्या विरोधात लोहारा पोलीस स्टेशनला रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.