धाराशिव – समय सारथी
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे 6 ऑगस्ट रोजी धाराशिव जिल्हा दौऱ्यावर असुन त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु आहे. मनोज जरांगे हे 6 ऑगस्ट रोजी मंगळवारी तुळजापूर येथे येणार असुन ते तुळजाभवानी मातेची आरती करुन आशीर्वाद घेतील व त्यानंतर तुळजापूर येथे समाज बांधव यांच्याशी चर्चा, बैठक घेतील व मुक्काम करतील त्यानंतर ते 7 ऑगस्ट रोजी सकाळी तुळजापूर येथून सोलापूरकडे रवाना होतील.
जरांगे यांच्या पश्चिम महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यातील शांतता रॅलीला 7 ऑगस्टपासुन सुरुवात होत आहे, ते 7 ऑगस्ट रोजी सोलापूर येथून रॅलीला सुरुवात करतील. दुसऱ्या टप्प्यातील शांतता रॅलीला तुळजाभवानी देवीचा आशीर्वाद घेऊन सुरुवात करतील, तुळजापूर येथील सकल मराठा समाज त्यांच्या आगमनाची जय्यत तयारी व नियोजन करीत आहे.