धाराशिव – समय सारथी
धाराशिव लोकसभा निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांना 2019 च्या तुलनेत सर्वच्या सर्व विधानसभा मतदारसंघात मोठी आघाडी मिळाली आहे. ओमराजे यांना औसा विधानसभा मतदार संघात 34 हजार 966, उमरगा 43 हजार 944, तुळजापूर 52 हजार 176, धाराशिव कळंब 60 हजार 423, परंडा सर्वाधिक 81 हजार 177, बार्शी 54 हजार 212 मतांची लीड मिळाली तर पोस्टल मतात 2 हजार 948 मतांची ओमराजे यांना आघाडी मिळाली. ओमराजे यांना 5,155 तर अर्चना पाटील यांना 2,207 मते पडली तर 1 हजार 391 अवैध मते पोस्टलमध्ये ठरली, सुशिक्षित लोकांकडून मतदान करताना मोठ्या चुका झाल्या.
2019 मध्ये ओमराजे यांना 49.5 टक्के मते पडली होती तर 2024 मध्ये 58.38 टक्के मते पडली आहेत. 2019 मध्ये राणाजगजितसिंह पाटील यांना 38.9 टक्के तर त्यांची पत्नी अर्चना पाटील यांना 2024 मध्ये 32.68 टक्के मते पडली. ओमराजे 2019 मध्ये 10 टक्के मतांच्या फरकाने निवडून आले होते तर 2024 मध्ये 25.72 टक्के मतांच्या फरकाने निवडून आले.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी विधानसभा मतदार संघात ओमराजे निंबाळकर यांना 54 हजार 212 मतांची आघाडी मिळाली आहे. अर्चना पाटील यांना 70 हजार 671 तर ओमराजे यांना 1 लाख 24 हजार 883 इतकी मते मिळाली आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत बार्शी विधानसभा मतदार संघाने शिवसेनेला केवळ 906 मतांची आघाडी दिली होती. 906 वरून 2024 ला 54 हजार 212 इतकी आघाडीचा आलेख ओमराजे यांनी बनवला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी विधानसभा मतदार संघात ओमराजे निंबाळकर यांना 54 हजार 212 मतांची आघाडी मिळाली आहे. अर्चना पाटील यांना 70 हजार 671 तर ओमराजे यांना 1 लाख 24 हजार 883 इतकी मते मिळाली आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत बार्शी विधानसभा मतदार संघाने शिवसेनेला केवळ 906 मतांची आघाडी दिली होती. 906 वरून 2024 ला 54 हजार 212 इतकी आघाडीचा आलेख ओमराजे यांनी बनवला आहे.लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदार संघात ओमराजे निंबाळकर यांना 34 हजार 966 मतांची विक्रमी आघाडी मिळाली आहे. लोकसभेची मतमोजणी पुर्ण झाल्यानंतर अर्चना पाटील यांना औसा विधानसभा मतदार संघात 67 हजार 282 तर ओमराजे यांना 1 लाख 2 हजार 248 इतकी मते मिळाली. वंचितचे भाऊसाहेब आंधळकर यांना 5 हजार 346 मते पडली. औसा येथे 2019 च्या तुलनेत 2024 मध्ये आघाडी 18 हजार 538 ने कमी झाली आहे.
लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदार संघात ओमराजे निंबाळकर यांना 34 हजार 966 मतांची विक्रमी आघाडी मिळाली आहे. लोकसभेची मतमोजणी पुर्ण झाल्यानंतर अर्चना पाटील यांना औसा विधानसभा मतदार संघात 67 हजार 282 तर ओमराजे यांना 1 लाख 2 हजार 248 इतकी मते मिळाली. वंचितचे भाऊसाहेब आंधळकर यांना 5 हजार 346 मते पडली. औसा येथे 2019 च्या तुलनेत 2024 मध्ये आघाडी 18 हजार 538 ने कमी झाली आहे.
उमरगा विधानसभा मतदार संघात शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार ओमराजे 43 हजार 944 मतांची आघाडी मिळाली आहे. मतमोजणी अखेर महायुतीच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना 62 हजार 725 मते तर ओमराजे यांना 1 लाख 6 हजार 669 इतकी मते मिळाली आहेत.
तुळजापूर विधानसभा मतदार संघात ओमराजे निंबाळकर यांना 52 हजार 176 मतांची आघाडी मिळाली आहे. भाजपमधुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन उमेदवारी मिळालेल्या अर्चना पाटील यांना 86 हजार 615 मते तर ओमराजे यांना सर्वाधिक 1 लाख 38 हजार 791 इतकी मते मिळाली आहेत.

धाराशिव विधानसभा मतदार संघात ओमराजे निंबाळकर यांना 60 हजार 423 मतांची आघाडी मिळाली आहे. अर्चना पाटील यांना 76 हजार 735 तर ओमराजे यांना विक्रमी 1 लाख 37 हजार 158 इतकी मते मिळाली आहेत.2019 च्या लोकसभा निवडणुकीत धाराशिव कळंब विधानसभा मतदार संघाने शिवसेनेला 8 हजार 412 मतांची आघाडी दिली होती मात्र ती आता 52 हजाराने वाढली आहे.
भुम परंडा वाशी विधानसभा मतदार संघात शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना विक्रमी 81 हजार 177 मतांची आघाडी मिळाली.अर्चना पाटील यांना या मतदार संघात सर्वात कमी 52 हजार 671 मते तर ओमराजे यांना 1 लाख 33 हजार 848 इतकी मते मिळाली आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत परंडा वाशी विधानसभा मतदार संघाने शिवसेनेला 22 हजार 78 मतांची आघाडी दिली होती ती वाढून आता 81 हजार झाली आहे.