हल्ला, बिलावरून वाद – नगर परिषद मुख्याधिकारी येलगट्टे यांच्या निवास्थानावरील प्रकार
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद नगर परिषदेचे मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून याबाबत यलगट्टे यांनी पोलिसांत लेखी तक्रार केली आहे. अजय सूर्यवंशी व त्यांच्यासोबत असलेल्या 4-5 जणांनी मद्य प्राशन करुन हातात कोयता घेऊन हा प्रकार केल्याची तक्रार त्यांनी दिली आहे. भर दिवसा घडलेल्या या प्रकारमुळे खळबळ उडाली आहे.
9 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास बँक कॉलनी येथील अजय सूर्यवंशी व इतर लोकांनी मद्य प्राशन करुन माझ्या निवासस्थानी येऊन प्रवेशद्वार बंद असल्याने संरक्षक भिंतीवरून उडी मारुन प्रवेश केला व हातात कोयता घेऊन तिथे कार्यरत असलेल्या 3 कर्मचारी यांना दमदाटी करुन हुज्जत घातली अशी तक्रार येलगट्टे यांनी केली असून नगर परिषद कार्यालयाला संरक्षण देऊन संबंधित विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
उस्मानाबाद शहरात कोरोना काळातील बॅरिगेटिंग, फवारणी व इतर केलेले कामाच्या बिलावरून हा सर्व प्रकार घडला आहे. यात तक्रारी असल्याने जवळपास लाखो रुपयांचे बिल अदा करण्यात आले नाही त्यामुळे हे झाल्याचे मुख्याधिकारी यलगट्टे यांनी सांगितले.
बातमी
कोरोना काळात कंटेनमेंट झोन प्रकरण – बोगस बिले सादर करुन लाखो रुपये लाटले
https://www.samaysarathi.com/2022/08/blog-post.html