बहिणीसाठी भाऊ छातीचा कोट करुन रिंगणात, ओमराजेंवर थेट हल्लाबोल
धाराशिव – समय सारथी
धाराशिव लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना राणाजगजीतसिंह पाटील यांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे नेते तथा पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत हे 3 ते 5 मे असे तीन दिवस प्रचार दौरा करणार आहेत. या दौऱ्यात मंत्री सावंत हे जाहीर प्रचार सभा घेणार आहेत. अर्चना पाटील यांना मी बहीण मानतो, बहिणीसाठी छातीचा कोट करुन निवडणुकीत उभा असेल व त्यांना निवडून आणण्याचा प्रण मंत्री सावंत यांनी भाषणातून व्यक्त करीत 24 तासात प्रचार यंत्रणा सक्रीय केली होती, त्यानंतर ते आता सभा घेणार आहेत.
भूम परंडा वाशी मतदारसंघात तीन दिवसांत 9 जाहीर सभेचे आयोजन केले असुन 3 मे शुक्रवारी सकाळी 9 वाजता जवळा ता परंडा,10.30 वाजता लोणी ता परंडा येथे, संध्याकाळी 8 वाजता मोहा येथे सभा घेणार आहेत. 4 मे 24 शनिवारी सकाळी 8.30 ला ईट ता भूम,सकाळी 11 ते 2 भूम शहर, संध्याकाळी 6.30 पाथरूड भूम व संध्याकाळी 8.30 वालवड भूम येथे सभा तर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी 5 मे रविवारी सकाळी 10.30वाजता वाशी शहरात तर सायंकाळी परंडा शहरात सभा आयोजित करण्यात आल्या आहेत
अर्चना पाटील यांच्या प्रचारात तानाजी सावंत यांनी आघाडी घेतली असल्याने महायुतीचे पारडे जड झाले आहे तर महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. डॉ तानाजीराव सावंत येणाऱ्या सभेतून ओमराजे यांच्यावर काय हल्लाबोल करतात याकडे लक्ष लागले आहे. मंत्री सावंत यांनी यापूर्वी थेट ओमराजे निंबाळकर यांचे नाव घेत हल्लाबोल केला, जे पाटील कुटुंबीयांना आजवर जमले नाही ते मंत्री सावंत यांनी भाषणातून बोलून दाखवत आरोप केले.