Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

राष्ट्रवादीकडुन प्रवीणसिंह परदेशी धाराशिव लोकसभा निवडणुक लढविणार ? राष्ट्रवादीच्या संभाव्य यादीत नाव 

समय सारथी by समय सारथी
March 25, 2024
in महाराष्ट्र
0
0
SHARES
20
VIEWS

धाराशिव – समय सारथी 

धाराशिव लोकसभा निवडणुकीत महायुतीचा उमेदवार अद्याप ठरला नसुन भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट व शिवसेना शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरु आहे. माजी सनदी अधिकारी तथा मित्रा या उपक्रमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी हे धाराशिव लोकसभा निवडणुक लढविण्यास उत्सुक असुन भाजप कडुन त्यांचे नाव आघाडीवर असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसकडुन देखील त्यांच्या नावाला पसंदी देण्यात आली आहे, राष्ट्रवादीच्या संभाव्य यादीत देखील त्याचे नाव असल्याचे समोर आले आहे त्यामुळे ते राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून निवडणुक लढवू शकतात. जागा राष्ट्रवादीला सुटल्यास परदेशी उमेदवार असतील अशी सूत्रांची माहिती आहे. परदेशी यांची भाजपला पसंती आहे मात्र जागा वाटपात तह होऊ शकतो. 

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने 7 जागांवर दावा केला आहे त्यात धाराशिव लोकसभेची जागा आहे, त्यात बारामती सुनेत्रा पवार, रायगड सुनील तटकरे, शिरूर आढळराव पाटील, सातारा उद्ययन राजे, गडचिरोली धर्मराव बाबा आत्राम, धाराशिव प्रवीणसिंह परदेशी अशी नावे चर्चेत आहेत. परभणी जागा महादेव जानकर यांना दिली आहे.

धाराशिव लोकसभेसाठी सेवानिवृत्त आयएएस अधिकारी प्रवीण परदेशी यांचे एकप्रकारे राजकीय लॉंचिंग व चाचपणी भाजपकडून केली जात आहे. राजकीय नेत्या ऐवजी सेवानिवृत्त अधिकारी या पर्यायाची चाचपणी या माध्यमातून भाजपकडुन केली जात आहे. मोदी यांनी अश्विनी वैष्णव, एस सुब्रह्मण्यम जयशंकर यासारख्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना थेट केंद्रीय मंत्री केल्याचा दाखला देत मोबाईल फोन द्वारे फोन करुन सर्वेक्षण केले गेले आहे.

परदेशी यांचा धाराशिव लोकसभेचा वाढता जनसंपर्क –

परदेशी हे भूकंप काळात लातूरचे जिल्हाधिकारी होते. धाराशिव हा आकांक्षित जिल्हा असुन त्याचा आधार घेत विविध शासकीय योजना अंमलबजावणीसाठी त्यांचा धाराशिव जिल्ह्यातील वावर वाढला आहे. प्रशासकीय बैठका, महिला मेळावे, आढावा बैठक तसेच गाठीभेटी यावर भर दिला आहे. कृष्णा खोरे पाणी, धाराशिव जिल्हा रुग्णालय, सोलर प्रकल्प, टेक्निकल टेक्स्टईल पार्क या विषयावर मार्ग काढण्यात परदेशी यांचा सहभाग दिसून येत आहे. 

परदेशी यांचा परिचय – 

63 वर्षीय प्रवीण परदेशी हे 1985 बॅचचे महाराष्ट्र केडरचे सेवानिवृत्त वरिष्ठ आयएएस अधिकारी असुन सध्या ते निती आयोगाच्या धर्तीवर राज्यात सुरु असलेल्या ‘मित्रा’ उपक्रमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.फडणवीस यांचे ते अत्यंत जवळीक व विश्वासू म्हणून ओळखले जातात.

तत्कालीन मुख्यमंत्री स्व विलासराव देशमुख व देवेंद्र फडणवीस यांच्या काळात त्यांनी मुख्यमंत्री सचिवालयाचा कारभार पाहिला आहे. अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाचे ते अधिकारी असुन मुख्य सचिव पदाने हुलकावणी दिल्याने ते केंद्रात जाऊन सेवानिवृत्त झाले. मित्रा उपक्रमावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी 3 वर्षासाठी त्यांची नेमणूक केली आहे.

लातूर येथील 1993 मधील भूकंप काळात ते जिल्हाधिकारी होते, भूकंपातील पुनर्वसन व जागतिक बँकेकडून मिळालेली मदत यात त्यांचा मोठा वाटा आह. अर्थशास्त्र व लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिकस येथे त्यांनी सामाजिक निती, भागीदारी योजना व आर्थिक विकास या विषयात मास्टरेट केली आहे. पनवेल, रायगड अमरावती, सोलापूर, लातूर, पुणे, मुंबई या ठिकाणासह त्यांनी वन पर्यावरण, वित्त, शहर विकास, महसूल विभागात व परदेशात 36 वर्ष सेवा केली आहे.भूकंप, केरळ आपत्ती, कोरोना काळात त्यांचे कार्य उल्लेखनीय राहिले आहे

Previous Post

कार्यसिद्धीमुळे मिळाली 108 जणांना दृष्टी – मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराची सांगता, कार्यसिद्धी प्रतिष्ठानचा उपक्रम

Next Post

शेतकऱ्यांची फसवणुक – पोलीस नाना भोसलेला अखेर अटक, 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी 

Related Posts

महाराष्ट्र

1 हजार 250 पानांचा लेखी युक्तिवाद – कै पवनराजे हत्याकांडात डॉ पद्मसिंह पाटील यांनी मांडली बाजु

March 7, 2026
महाराष्ट्र

सीबीआयचे प्रतिउत्तर – कै पवनराजे दुहेरी हत्याकांड, 24 मार्चला पुढील सुनावणी 

March 7, 2026
महाराष्ट्र

आज सुनावणी – महाकाली कला केंद्र, जिल्हाधिकारी यांच्या विरोधात अवमान याचिका, भाडेतत्वासह नियमांचा भंग

March 7, 2026
महाराष्ट्र

घडामोडी – आमदार सावंत यांची रोचकरी यांनी घेतली भेट, चर्चा

March 7, 2026
महाराष्ट्र

वरदहस्त कोणाचा ? जेलमध्ये रवानगी – परंडा ड्रग्ज रॅकेटचा मास्टर माईंड कोण ? तपास सुरु

March 7, 2026
महाराष्ट्र

कोर्टाचा निर्णय – माळुब्रा येथील सरपंच सुतार यांना दिलासा – ऍड इंगळे यांचा यशस्वी युक्तिवाद

March 6, 2026
Next Post

शेतकऱ्यांची फसवणुक - पोलीस नाना भोसलेला अखेर अटक, 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

1 हजार 250 पानांचा लेखी युक्तिवाद – कै पवनराजे हत्याकांडात डॉ पद्मसिंह पाटील यांनी मांडली बाजु

March 7, 2026

सीबीआयचे प्रतिउत्तर – कै पवनराजे दुहेरी हत्याकांड, 24 मार्चला पुढील सुनावणी 

March 7, 2026

आज सुनावणी – महाकाली कला केंद्र, जिल्हाधिकारी यांच्या विरोधात अवमान याचिका, भाडेतत्वासह नियमांचा भंग

March 7, 2026
March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp