परंडा – समय सारथी
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वागताच्या बॅनर शेजारी शिवसेना शिंदे गटाचे बॅनर लागले आहेत. परंडा तालुक्यातील सोनारी येथे शिवसेना शिंदे गटाचे बॅनर लागले असुन बघतोस काय रागानं तुला खासदार केलंय वाघान असे बॅनर आहेत.
भावी खासदार धनंजय सावंत असे बॅनर असुन सोनारी येथे भरघोस निधी दिल्याने मंत्री सावंत यांच्या आभाराचे बॅनर इथल्या कार्यकर्ते यांनी लावले आहेत. तत्कालीन विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांचे तिकीट कापून ओमराजे यांना खासदार करण्यात मंत्री तानाजीराव सावंत यांचा मोठा वाटा असल्याने शिंदे गटाने त्या आशयाचे बॅनर लावले आहेत.
राज्याच्या राजकारणात मंत्री तानाजीराव सावंत यांची भुमिका महत्वाची राहिली आहे, ते किंगमेकर व जाईंट किलर म्हणून ओळखले जातात. महायुतीत धाराशिवची जागा ही परंपरागत शिवसेनेकडे राहिली आहे शिवाय मंत्री सावंत यांनी या जागेवर दावा ठोकला आहे. त्यातच त्यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी उमेदवारीवर दावा ठोकला असुन जनसंपर्क कार्यालय व इतर कार्यक्रम घेऊन प्रचाराला सुरुवात केली आहे.
धनंजय सावंत हे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, बांधकाम सभापती असुन ते जिल्ह्याच्या राजकारणात सक्रीय आहेत शिवाय दांडगा जनसंपर्क व सर्वपक्षीय नेत्यांशी जवळीक आहे. शिवजल क्रांती, भैरवनाथ साखर कारखाना, जिल्हा परिषद व इतर स्थानिक निवडणुका याच्या माध्यमातुन धनंजय सावंत यांचा जनसंपर्क तळागाळातील कार्यकर्त्यात आहे.