आरोग्य मंत्री डॉ सावंत यांची बदनामी, 4 जणावर गुन्हा नोंद
उस्मानाबाद – समय सारथी
राज्याचे आरोग्यमंत्री तथा उस्मानाबादचे पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत
यांची बदनामी केल्याप्रकरणी 4 जणावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. उस्मानाबाद
जिल्ह्यातील भुम पोलिस ठाण्यात बदनामीकारक मजकूर सोशल मीडियावर पोस्ट
करणाऱ्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. आरोग्यमंत्री डॉ सावंत यांचा उल्लेख
खेकडा, हाफकीनसह अन्य जोक वापरून मिम्स करुन सोशल मीडियावर पोस्ट केल्या
गेल्या व त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे भुम तालुका प्रमुख बालाजी गुंजाळ
यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हे गुन्हा
उस्मानाबाद सायबर विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. माहिती तंत्रज्ञान अधिनियम
2000 चे कलम 67 सह इतर कलमाने गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

भूम तालुक्यातील काही जणांनी सोशल मीडियावर ग्रुप तथा वैयक्तिक पेजच्या
माध्यमातून पालकमंत्री डॉ सावंत यांच्याबद्दल अवमानकारक आणि बदनामी
होण्यासाठी त्यांच्या फोटोवर विविध मजकूर लिहून प्रसिद्ध केला. सोशल
माध्यमांवर मेम्स कट्टा या नावाने ग्रुपवर अर्जुन शिंदे यांनी मीम नाका
ग्रुपवर जितेंद्र रायकर, एक कोटी हसणाऱ्या लोकांच्या ग्रुपवर आर. एन. पाटील
आणि रोशनी शिंदे – पवार यांनी आपल्या वैयक्तिक पेजवर डॉ. सावंत
यांच्याविरोधात त्यांचा अवमान करण्यासाठी द्वेषभावनेतून आणि त्यांचा आदर कमी
करण्यासाठी सार्वजनिक रीतीने सावंत यांच्या वैयक्तिक फोटोवर इतर मजकूर
लिहून बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी भूम पोलिस ठाण्यात गुन्हा
दाखल झाला आहे.